Hingoli Smart Meter: हिंगोलीतील भांडेगावात स्मार्ट मीटरचा वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर ग्राहकांनी अनाधिकृत जोडणी करून वीज वापर सुरू केला, त्यामुळे ८ जणांवर गुन्हे दाखल.
थकबाकीमुळे स्मार्ट मीटरचा खंडीत केलेला विज पुरवठा ग्राहकांनी अनाधिकृतरित्या जोडणीव्दारे केला सुरू
हिंगोली तालुक्यातील भांडेगावात उघडकीस आलेला प्रकार
हिंगोली (Hingoli Smart Meter) : तालुक्यातील भांडेगाव येथे अनेक वीज ग्राहकाकडे महावितरणची थकबाकी असल्याने स्मार्ट मीटरवरील वीज पुरवठा संगणक प्रणालीव्दारे पुर्वीच बंद केला होता. परंतु वीज ग्राहकांनीही त्यावर तोडगा काढून ग्राहकांच्या मीटरला येणार्या वीजेच्या तारेला अनाधिकृतरित्या वीज जोडणी करून थेट वीज वापर सुरू केल्याने )Hingoli Smart Meter_ महावितरण कंपनीने ८ वीज ग्राहकावर गुन्हे दाखल करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात बहूतांशी वीज ग्राहकांचे (Hingoli Smart Meter) वीज मीटर मध्यंतरीच्या कालावधीत बदलण्यात आली. सध्यास्थितीत अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्याने महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्यांना रिडींग घेण्यापासून ते वीज देयके वसुली करण्याकरीता मोठा हातभार लाभत आहे. स्मार्ट मीटरमुळे महावितरण कंपनीला मोठी सुलभता झाली आहे. विशेष म्हणजे मार्च एन्डमध्ये वीज ग्राहकाकडील थकबाकी रक्कम जमा करण्या करीता महावितरणच्या अधिकार्यासह कर्मचार्यांचे पथके तयार करून देयके वसुलीसाठी दारोदारी फिरावे लागत होते. परंतु स्मार्ट मीटर बसविल्याने थेट संगणक प्रणालीव्दारे थकबाकीदार वीज ग्राहकांचा पुरवठा प्रणालीव्दारेच बंद केला जात आहे. परंतु अशा परिस्थितीत काही वीज ग्राहकांनी एक वेगळी शक्कल लढवून ग्राहकांच्या (Hingoli Smart Meter) मीटरला येणार्या तारेला अनाधिकृतरित्या जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे अशी वीज चोरी उघड करण्या करीता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अनेक ठिकाणी पाहणी करीत आहेत.
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे १४ मार्चला (Hingoli Smart Meter) महावितरणच्या पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान काही ठिकाणची वीज चोरी उघड झाली. शिवाजी किशनराव जगताप, संतोष रामेश्वर जगताप, लक्ष्मण अभना जगताप, वैजनाथ विश्वनाथ जगताप, श्रीमती चंद्रभागा केदारलिंग जगताप, श्रीमती गिताबाई लक्ष्मण जगताप, नामदेव भिकाजी जगताप, रामा रुस्तुमा जगताप या वीज ग्राहकांकडे महावितरणची थकबाकी असल्याने संगणक प्रणालीव्दारे स्मार्ट मीटरचा वीज पुरवठा खंडीत केला होता. परंतु या ग्राहकांनी मीटरला येणार्या तारेला अनाधिकृतरित्या जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर सुरू केल्याचे तपासणी दरम्यान निर्दशनास आल्याने २३ मार्चला हिंगोली शहर पोलिसात महावितरणचे सहाय्यक अभियंता अशोक कामडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ वीज ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा सन २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. हा गुन्हा हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.