Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > क्राईम जगत

तिरोडा अपघात

टिप्परने दुचाकीस्वार मायलेकास चिरडले...

Tiroda Accidental Death: तिरोडा-तुमसर मार्गावर सुकडी नाक्याजवळ भरधाव टिप्परने दुचाकीस्वार मायलेकास चिरडून ठार मारले, तर दुचाकी चालक म्हणजेच महिलेचा पती गंभीर रूपाने जखमी झाला.


टिप्परने दुचाकीस्वार मायलेकास चिरडले

Tiroda Accidental Death |

सुकडी फाट्यावरील घटना : पती जखमी

तिरोडा (Tiroda Accidental Death) : तिरोडा-तुमसर मार्गावरील सुकडी नाका परिसरात एका भीषण रस्ते अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला.  एका भरधाव टिप्परने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत चिरडले. ही घटना आज (ता.२३) सायंकाळी ४.३५ वाजता सुमारासची आहे. या घटनेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हंसलता चौधरी (३५) आणि तन्मय चौधरी (९) रा.कासा, काटी-बिरसोला असे मृतांची नावे आहेत. तर दुचाकी चालक मृतक महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर असे की, चौधरी कुटुंब हे दुचाकी क्रमांक एमएच-३५/ एव्ही- ४१०२ ने कासावरून नागपूरकडे जात होते. तुमसर-तिरोडा मार्गावर सुकडी फाट्याजवळ सायंकाळी ४:४५ च्या सुमारास काळ बनून आलेल्या  एका भरधाव टिप्परने दुचाकीला जबर धडक देत चिरडत नेले. (Tiroda Accidental Death) धडक इतकी भीषण होती की, हंसलता आणि तन्मय या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक टिप्परसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. या प्रकरणी गुन्हा नोंद करून तिरोडा पोलिस फरार टिप्पर आणि चालकाचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुरूवार दुसर्‍यांदा ठरला ‘काळ’वार

तिरोडा तालुक्यात सतत दोन (Tiroda Accidental Death) आवठड्यापासून गुरूवार दिवस काळाचा दिवस म्हणून चर्चेत आला आहे. मागच्या गुरूवारी (ता.१६) कोळसा वाहतूक करणार्‍या ट्रकने दुचाकीला स्वार जबर धडक दिली होती. यात डिलेश पारधी याचा जागीच मृत्यू झाला. तर आज (ता.२३) पुन्हा एका भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटूंबातील मायलेक ठार झाले तर महिलेचा पती जखमी झाला. सततच्या प्राणांतिक घटनांमुळे गुरूवार तिरोड्यासाठी काळवार ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

Related to this topic: