Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > क्राईम जगत

सोनपेठ दुकान चोरी

सोनपेठ येथील आठवडी बाजारातील किराणा दुकानात चोरी; आरोपीस मुद्देमालसह अटक

Sonpeth shop theft: सोनपेठ आठवडी बाजारातील श्री समर्थ प्रोव्हीजन किराणा दुकानात ५९ हजार ५१७ रुपयांच्या मुद्देमालाची चोरी. स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली.


सोनपेठ येथील आठवडी बाजारातील किराणा दुकानात चोरी आरोपीस मुद्देमालसह अटक 

Sonpeth shop theft |

स्थानिक गुन्हे शाखा व सोनपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई

परभणी (Sonpeth shop theft) : सोनपेठ शहरातील आठवडी बाजारात असलेल्या श्री समर्थ प्रोव्हीजन किराणा दुकानाचे शटर तोडून किराणा माल अंदाजे ५७ हजार १७ रुपये व नगदी दोन हजार ५०० रुपये असा एकूण ५९ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दि १९ एप्रिल रोजी उघडकीस आले होते.याप्रकरणी सोनपेठ पोलीस स्थानकात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोनपेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कारवाईने दोन आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.या धडक कारवाईमुळे सोनपेठ शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

सोनपेठ शहरातील आठवडी बाजारात असलेल्या श्री समर्थ प्रोव्हीजन किराणा दुकानाचे शटर (Sonpeth shop theft) तोडून अज्ञात आरोपींनी दुकानातील काउंटरचा गल्ला तोडून नगदी २ हजार ५०० रुपये तसेच काजु ,बदाम, पिस्ता,काळा मनुका,काळी खारीक,काळी खजुर, जर्दाळू,आक्रोड, सुपारी,गाय छाप,गोल्ड सिगारेट, ब्रिस्टॉल,याचा अंदाजे५७ हजार १७ आसा एकुण ५९ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.या प्रकरणी सोनपेठ पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहे.मदतीला स्थानिक गुन्हे शाखा पथक अज्ञात आरोपींच्या शोधात आले होते.गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांच्या आत मुद्देमाल व दोन आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपास कामी देण्यात आले आहे.तर यातील एक आरोपी फरार आहे.

सदर कारवाईत अज्ञात आरोपींनी दुकानातील चोरीला (Sonpeth shop theft) गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर‌ कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व सोनपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अशोक गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे.यामध्ये पोउपनि चंदनसिंह परिहार, पोउपनि अजय किरकन, महेश कवठाळे राहुल परसोडे दिलिप निलपत्रेवार माणिक वाघ शरद सावंत लक्ष्मण कांगणे श्रीकृष्ण तिडके, अशोक हिंगे, भुसणार यांचा समावेश होतो.या धडक कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनपेठ पोलीसांनी आवाहन केले आहे की,नागरिकांनीही रात्रीच्या वेळी सतर्क राहून, संशयास्पद हालचाली विषयी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.सोनपेठ शहरातील दुकानदारांमध्ये पोलिसांबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

Related to this topic: