Parbhani Godavari Death: १४ जून रविवारी सकाळी साडेसात वाजता मोहळा येथील दोन शेतकर्यांचे बहिणी (उत्कर्षा,1८; समीक्झा,१६) काकुच्या पाण्यात बुडून मृत होण्याची घटना घडली.
आंघोळ करण्यासाठी उतरल्या होत्या नदीपात्रात
सोनपेठ तालुक्यातील मोहाळा येथील घटना
परभणी/सोनपेठ (Parbhani Godavari Death) : तालुक्यातील मोहळा येथे आंघोळीसाठी गोदावरी नदीपात्रात उतरलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह काकुचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवार १४ जून रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मोहळा येथील शेतकरी उत्तम देवीदास जाधव यांच्या मुली उत्कर्षा (वय १८) व समीक्षा (वय १६) या रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास काकु सिंधू दत्ता जाधव यांच्यासोबत गावाजवळील गोदावरी नदीकाठी आंघोळीसाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना दोघींचा पाण्याचा अंदाज चुकल्याने त्या नदीच्या खोल पाण्यात बुडू लागल्या. दरम्यान, ही बाब लक्षात येताच सिंधु दत्ता जाधव (वय ४५) यांनी दोन्ही मुलींना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, (Parbhani Godavari Death) पाण्याचा प्रवाह व खोली यामुळे त्यांनाही बाहेर येणे शक्य झाले नाही आणि त्या देखील पाण्यात बुडाल्या.
घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने नदीकाठी जमा झाले. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून तिघींचा शोध घेतला असता त्यांचे (Parbhani Godavari Death) मृतदेह पाण्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिघींनाही तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, सोनपेठ येथे आणण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. उमाकांत राठोड यांनी शवविच्छेदन केले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. या प्रकरणी दौलत जाधव यांनी दिलेल्या माहितीवरुन सोनपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे मोहळा गावावर शोककळा पसरली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.