रिसोड (Risod tractor accident) : दुधाच्या क्यानी घेऊन येत असलेल्या चार चाकी इंट्रा वाहनाने अध्यात ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीरित्या जखमी झाला आहे. ही घटना दिनांक 24 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता रिसोड सेनगाव मार्गावर मुंगसाजी नगर जवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की मृतकास काढण्यासाठी एक ते दीड तास लागला. यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. घटनेनंतर अज्ञात ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
वैजनाथ भाऊराव मुकाडे वय 24 वर्ष राहणार खिलार तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असे मृतकाचे नाव असून वाहन चालक दतराव धुरपतराव चिलधर वय 26 वर्ष राहणार खिलार तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असे जखमीचे नाव असून जखमीस प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले तर पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, (Risod tractor accident) हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात घेत असलेला खिलार येथील दतराव धुरपतराव चिलधर हे आपल्या एका अन्य साथीदार वैजनाथ भाऊराव मुकाडे याच्यासह आपले इंट्रा वाहन क्रमांक एम एच 38 एक्स 3890 ने सेनगावच्या दिशेने रिसोड कडे दुधाच्या कॅन घेऊन येत असताना रात्री अकरा वाजता च्या दरम्यान समोरून चालत असलेल्या एका अज्ञात ट्रॅक्टरला जबर धडक दिली.
या (Risod tractor accident) धडकेत कंडक्टर साईटचा वाहनाचा अक्षरचा चुराडा झाला यामध्ये वैजनाथ मुकाडे याचा जागीच मृत्यू झाला तर दतराव चिलधर हे गंभीरित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक गीते हे घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणी पाहणी केली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीस रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले व तसेच मृतकास एक ते दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढून रिसोड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल केले. दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी मृतकावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह परिवारात सुपूर्द करण्यात आले. सदर घटनेस कारणीभूत ट्रॅक्टरचा रिसोड पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली नाही पुढील तपास रिसोड पोलीस करत आहे.
रिसोडमध्ये चार चाकी वाहनाची ट्रॅक्टरला धडक, एक ठार
Risod tractor accident: रिसोडमध्ये 24 एप्रिल रोजी रात्री एका चार चाकी वाहनाने ट्रॅक्टरला धडक देऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात भीषण होता.
Risod tractor accident
संबंधित सामग्री
आंबाळा फाट्यावरील अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Ambala Phata Fatal accident: हिंगोली-वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील अंबाळा फाटा येथे सोमवारी (ता. १६) सायंकाळी ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बोंडाळा येथील विजय कांबळे (वय ४५) यांचा मृत्यू
परभणीत प्रशिक्षणासाठी गेलेल्या शिक्षकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Parbhani Teacher Death: तालुक्यातील धर्मापुरी येथील एका शाळेवर सुरू असलेल्या प्रशिक्षणा साठी गेलेल्या तरुण शिक्षकाची अचानक प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून चित्रपट दिग्दर्शकाला अटक
अशोक चव्हाणांसह चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी! एक लाखांच्या खंडणी प्रकरणात चित्रपट दिग्दर्शकाला मुंबईतून अटक.
दिल्लीत दोन मजली इमारत कोसळली; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू!
Delhi House Collapse: राजधानी दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. विवेक विहारमधील ज्वाला नगर परिसरात दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
उत्तराखंडमध्ये दोन भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू!
Uttarakhand Horrific Accident:उत्तराखंडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. रुद्रप्रयाग जिल्ह्यात वाहन सुमारे 500 मीटर खोल दरी