Risod Police Action: रिसोड पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपींची चौकशी करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा माल जप्त केला.
वेगवेगळया आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस; तब्बल 4 लाखांचा मुददेमाल जप्त
रिसोड (Risod Police Action) : फिर्यादी दत्ता नामदेव उगले, यांनी पोलीस स्टेशन रिसोड येथे रिपोर्ट दिला होता की, बिबखेडा शेतशिवारातील गट क. १७२ मध्ये असलेल्या शेतातील कुड पत्र्याच्या घरात झोपलो असतांना तिन अनोळखी व्यक्तींनी आम्ही झोपलेल्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून माझी आई ग. भा. आसराबाई उगले व पत्नी सौ. सावित्री उगले यांच्या अंगावरील सोन्या व चांदीचे दागिने किं. अं. ६३,०००/- रू., एक जुना वापरता आकाशी रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल किं.अं. ८०००/- रू. व घरात ठेवलेले नगदी ठेवलेले १०,०००/- रू. असा एकूण ८१,०००/- रू. चा ऐवज तिन अनोळखी व्यक्तीने जबरीने काढून घेवून गेले. अशा फिर्यादवरून तीन अनोळखी आरोपींविरूध्द भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०९ (४), ३३३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच दिनांक १०/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे विकास विश्राम जायभाये, वय २८ वर्षे, रा.धाड, ता.लोणार, जि. बुलढाणा ह.मु. ग्राम चाकोली, ता. रिसोड, जि. वाशिम यांनी येवून जबानी रिपोर्ट दिला की, दिनांक ०९/०३/२०२६ चे ११/४५ वा. ते दिनांक १०/०३/२०२६ चे ०१/३० वा. दरम्यान मी माझ्या परिवारासह राहत असलेल्या टिनपत्र्याच्या घरी हजर असतांना ०४ अनोळखी लोकांनी चाकूचा धाक दाखवून घरात प्रवेश करून व जिवाने मारण्याची धमकी देवून माझ्या आईच्या अंगावरील, पत्नीच्या अंगावरील व घरात ठेवलेले लहान मुलाचे चांदीचे दागिने असा सोन्या व चांदीचा ऐवज किं.अं. ३०,०००/- रू. चा मुददेमाल जबरीने काढून चोरून नेला. (Risod Police Action) तसेच माझ्या शेजारी राहणारे आसाराम महादा पोटे वय २२ वर्षे यांच्या घरात सुध्दा वरील वर्णनाच्या ०४ अनोळखी लोकांनी चाकूचा धाक दाखवून जिवाने मारण्याची धमकी देवून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचा ऐवज, मोबाईल फोन व नगदी मिळून २८,०००/- रू. चा मुददेमाल जबरीने काढून चोरून नेला. अशा फिर्यादवरून चार अनोळखी आरोपींविरूध्द भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील अनोळखी आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी. पथकास दिल्या होत्या. त्यानंतर डी. बी. पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी तांत्रिक पध्दतीच्या माध्यमातून व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा शोध घेतला व सदर गुन्हयात दोन आरोपींना वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेवून गुन्हयासंबंधाने सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली व त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, एक जुना वापरता आकाशी रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल, चोरी करतांना गुन्हयात वापरलेला एक मोबाईल, एक जिवंत काडतूस, एक स्टीलचा खंजीर व एक पल्सर कंपनीची मोटार सायकल असा एकूण ३,५०,१५०/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. रिसोड पोलीसांच्या या कामगिरीमूळेगुन्हयातील पिडीत शेतमजूर व शेतकरी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला व काही दिवसांतच गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करून मुददेमाल हस्तगत केल्याने त्यांनी पोलीसांचे कौतूक केले.
याव्यतिरिक्त दिनांक २९/०३/२०२६ रोजी फिर्यादी सतिश दत्तराव ठोकरे, वय ४० वर्षे, रा.चाफेश्वर चौक, मालेगाव नाका, रिसोड, जि. वाशिम यांनी येवून जबानी रिपोर्ट दिला की, दिनांक २९/०३/२०२६ चे ११/४५ वा. दरम्यान फिर्यादी हे त्यांचे चाफेश्वर किराणा दुकानावर गिऱ्हाईकी करीत असतांना इसम संतोष विठठल शेळके, वय ३० वर्षे, रा. दिग्रस कराळे, जि. हिंगोली याने दुकानासमोरील १५ लिटरच्या तिन कॅन किं.अं. ७५००/- रू. चे चोरून नेले आहे. अशा फिर्यादवरून नमूद आरोपी याचेविरूध्द भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीस ०२ तासांच्या आत शोधून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडून गुन्हयात चोरी गेलेल्या १५ लिटरच्या तिन कॅन किं.अं. ७५००/- रू. पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, मा. सहायक पोलीस अधीक्षक, वाशिम नवदिप अग्रवाल (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, ग्रेड पोउपनि. कदीर खॉ पठाण, पोलीस हवालदार मंगेश मालवे, निलेश तायडे, पोलीस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे, रवि इरतकर, अमोल हाके, सायबर सेलचे पोलीस अंमलदार अभिनव वाघाडे यांनी केली आहे.