International Doctoral Degree: दिल्ली येथे युनाईटेड युनिवर्सिटी ऑफ अमेरीका द्वारे आयोजित कार्यक्रमात रवि भांदककार यांना आंतरराष्ट्रीय मानद पदवी प्रदान करण्यात आली.
अहेरी श. (International Doctoral Degree) : जागतीक मास्टर्स कराटे विजेते तथा एकात्मिक आदिवासी विकास विभाग अहेरी येथील क्रीडा मार्गदर्शक सेन्साई रवि भांदककार (Dr. Ravi Bhandakkar) यांना नूकत्याच 25 एप्रिल 2026 रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे झालेल्या युनाईटेड युनिवर्सिटी ऑफ अमेरीका द्वारे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. मार्शल आर्ट मध्ये मागील सात वर्षांपासून सुरु असलेल्या "आतंरराष्ट्रीय मार्शल आर्ट तथा फिजिओथेरोपी" या विषयाला घेऊन अभ्यास सुरु होता. तो त्यांनी त्यांचे आतंरराष्ट्रीय मार्गदर्शक व सत्कार कार्यक्रमाचे पाहुणे डाॅ. शिवकुमार रामलिगंम, अँकेडमीक बोर्ड मेबंर यु.ए.यु द्वारा दिल्ली येथे आतंरराष्ट्रीय विद्यापीठ दिक्षातं समारोहात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी तीस देशातील विविध क्षेत्रातुन विषयानूरुप ऊल्लेखनीय कार्य करणार्या 107 महानुभवानां मानद पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले . यावेळी युनायटेड अमेरीकन युनिवर्सीटीचे डिन तथा न्यायाधीश डाॅ.के.व्येकंटेशन,चिफ गेस्ट,डाॅ.राजा मनवेन्द्र सिगं, खासदार तथा विशेष मंत्री मथुरा क्षेत्र,प्रोफेसर वल्लीपुरम कनागासिगंम ऊपकुलगूरु ईस्टर्न विद्यापीठ श्रीलंका, डाॅ.के.सुकुमारा राष्ट्रीय आयुक्त भारत स्काऊट अँन्ड गाईड, प्रा.डाॅ.पि.अमृतावल्ली ऊप कुलगूरु युनाईटेड अमेरीकन युनिवर्सिटी, डाॅ.दिपक चावला आर.पी.आय.आठवले दिल्ली, डाॅ.श्यामा हुसैन कुलगूरु क्राऊन युनिवर्सीटी आतंरराष्ट्रीय अंकेक्षक,डाॅ.जाधव अनिलकुमार मेबंर एसम्बली तेलंगाना राज्य, डाँ.नागेश्वरा राव चिठ्ठीराला हिदिं अँडवाईझरी कमीटी मिनीस्ट्री होम अफेअर्स भारत सरकार तथा कुलगूरु युनाईटेड अमेरीकन युनिवर्सीटी,डाॅ. विल्लाट कोरीये देश निर्देशक यु.ए.ई, वर्ल्ड सिटीझन डाॅ.ए.जोसेफ, कोलंबो,लंडन युके,जागतीक सेवक अँथोरीटी,तथा ईतर 35 देशातील ऊपस्थीत कुलगूरु,उपकुलगूरु तथा सर्व मार्शल आर्ट ग्रॅन्डमास्टर्स व 107 मानद प्राप्त करणारे मानदी यानां सम्मान देऊन गौरविण्यात आले.
येत्या 16 आँगष्ट 2026 ला चैन्नई तामीलनाडु येथे होणार्या (International Doctoral Degree) जागतीक वर्ल्ड जिनीयस रेकार्ड च्या तयारी करीता विदेशीय माहीती संकलन व थेसीस तयार करुन या मध्ये जिनीयस रेकार्ड करण्याकरीता युनाईटेड अमेरीकन युनिवर्सीटी आर्थिक प्रायोजकत्व पण करेल असे न्यायदिश व कुलगूरु डाॅ.के.व्येकंटेशन यांनी सांगीतले.यात अहेरीचे सेन्साई डाॅ.रवि भांदककार (Dr. Ravi Bhandakkar) यानां हा सम्मान व जिनियस रेकाॅर्ड करण्याची संधी ही सर्वपरीय आहे.
यावेळी डाॅ. रवि भांदककार (Dr. Ravi Bhandakkar) यांनी म्हटले की हा सम्मान माझा नाही तर संम्पुर्ण अहेरी, गडचिरोली, महाराष्ट्र, भारतीयांचा गौरव आहे. सदर सन्मान सर्व माझे मार्गदर्शक गूरु व सर्व सम्मान्नीत गणानां अर्पण करतो तसेच या मध्ये त्याचे आदर्श व मार्गदर्शक असलेले गूरु राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विनोद भोसले, माजी स्काऊट आयुक्त यानां प्राधान्याने दिले. तसेच त्यांची पत्नी सौ किरण रवि भांदककार यांनी वेळोवेळी पुर्णपणे स्वातंत्रीक सहकार्य दिल्याने हे शक्य होऊ शकले तसेच त्याचे राष्ट्रीय गूरु ग्रँन्डमास्टर दाई सेन्साई मोसेस तिलक , ग्रँन्डमास्टर वर्ल्ड तायकांडो चिफ डाॅ.शिवकुमार लिगंम विषय मार्गदर्शक, डाॅ.एच आर एच, ईडोनेशिया ग्रँन्डमास्टर एम.ए.अली , विदर्भ मार्गदर्शक सेन्साई अरविदं पाटील आदी त्यांचे प्रमुख सहाय्यक होते म्हणुन या सर्वानां या पदवीचे श्रेय जाते .
यावेळी त्यानां (International Doctoral Degree) आतरराष्ट्रीय तायकांडो कोरीयाची ब्लॅकबेल्ट डाॅन डिग्री व प्रमाणपत्र देऊन सम्मानीत करण्यात आले. त्यांनी ही परीक्षा 2023 मध्येच पास केली होती. डाॅ. सेन्साई रवि भांदककार यांचे अहेरी जिल्हा कृती समिती, तालुका पत्रकार संघटना अहेरी व विदर्भ आंदोलन समिती च्या पदाधिकाऱ्यांनी रविचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा प्रदान केल्या.