Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > क्राईम जगत

रश्मी बागडे

अज्ञात वाहनाच्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यु, दोघी जखमी

Rashmi Bagde Death: भरधाव वाहनाने जोरदार धडक मारल्याने तरूणी रश्मी बागडे रोडवर खाली पडुन वाहनाने तिचे डोके फुटुन रक्तस्त्राव


अज्ञात वाहनाच्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यु दोघी जखमी

Rashmi Bagde Death |

हळदीला जाताना अपघातात रश्मी बागडेचा घटनास्थळीच मुत्यु

कन्हान (Rashmi Bagde Death) : नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील एमएचकेएस पेट्रोल पंपच्या थोडे पुढे १०० मि टर वाघोली शिवारात स्कुटी दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक मारल्याने तरूणी रश्मी बागडे (Rashmi Bagde Death) रोडवर खाली पडुन वाहनाने तिचे डोके फुटुन रक्तस्त्राव झाल्याने तिचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर दोघी तरूणी स्कुटीसह घासत गेल्याने जखमी झाल्याने त्यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटने मुळे कन्हान परिसरात हळहळ व्यकत होत आहे. 

कन्हान येथुन मृतक रश्मी विनोद बागडे (Rashmi Bagde Death) वय २३ वर्षे रा. स्टेट बँक मागे हनुमान नगर कन्हान,  तेजस्विनी प्रमोद बावनकुळे वय २४ वर्षे रा. इंदिरा नगर कन्हान, आणि श्रद्धा दिलीप बंड वय २४ वर्षे रा. सुपर टाऊन कन्हान या तिघी स्कुटी क्र. एम एच ४० सी एल ७६८९ दुचाकीने वाघोली गावातील त्यांच्या मैत्रीणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना रात्री ९ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील एमएचकेएस पेट्रोल पंप च्या थोडे पुढे १०० मिटर लांब वाघोली शिवारात स्कुटी दुचाकी ला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार झडक मारल्याने मागे श्वार तरूणी रोडवर खाली पडुन वाहनाच्या माराने तिचे डोके फुटुन रक्त स्त्राव झाल्याने तिचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर दोघी तरूणी स्कुटीसह सामोर घासत गेल्याने जख्मी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन कु. तेजस्विनी गंभीर जख्मी असल्याने आयसीओ मध्ये उपचार सुरू आहे.

अपघाताची (Rashmi Bagde Death) माहिती मिळताच कन्हान पोलीस  घटनास्थळी पोहचुन पंचनामा करित पोलिस मित्र तथा समाजसेवक अनिल आंबिलढुके यांना बोलावुन त्याचे टाटा एस क्र. एमएच ४० सी एम ७४२७ या चारचाकी वाहनात तरूणीचा मुतदेह उचलुन ठेऊन कामठी उपजिल्हा रूग्णालयात उत्तरिय तपासणी करिता नेण्यात आला. कन्हान पोलीसानी फिर्यादी श्रध्दा बंड या जख्मी तरुणीचा तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध अप.क्र. २८६/२०२६ व कलम १०६ (१), २८१ बीएनएस सह कलम १८४ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .