Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

युवकाचा मृत्यू राजगाव पेट्रोलपंप अपघातात

Young Man Death: दुचाकी डिव्हायडरला धडकली; तरुणाचा मृत्यू

राजगाव येथे पेट्रोलपंप परिसरात दुचाकी अपघातात ३२ वर्षीय गणेश वैद्य यांचा मृत्यू झाला. अज्ञात कारणांमुळे अपघात झाला असून तपास सुरू आहे.


young man death दुचाकी डिव्हायडरला धडकली तरुणाचा मृत्यू

राजगाव पेट्रोलपंप परिसरातील अपघात

फाळेगाव (Young Man Death) : वाशिमवरून कनेरगावकडे जाणाऱ्या दुचाकीचा राजगाव येथील पेट्रोलपंप परिसरात डिव्हायडरला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १२ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या (Young Man Death) अपघातात दुचाकीवरील दुसरा एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेला तरुण गणेश मोतीराम वैद्य (वय ३२, रा. फाळेगाव, ता. जि. हिंगोली) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाशिम ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गणेश वैद्य हे टिळ्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने वाशिमवरून आपल्या गावी जात असताना राजगाव येथील पेट्रोलपंपाजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी थेट रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. धडक जोरदार असल्याने गणेश वैद्य यांना गंभीर दुखापत झाली. (Young Man Death) अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दुचाकीवरील दुसरा व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. (Young Man Death) घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पुढील तपास सुरू आहे.

 

Related to this topic: