Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

परभणी भाविक अपघात

परभणीतील देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात...!

Parbhani devotee accident: गंगाखेड येथील राजस्थानमध्ये देवादर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला जयपूर जवळील चोमू येथे अपघात झाल्याने या अपघातात तालुक्यातील हरंगुळ येथील अनुक्रमे ४० व ७५ वर्षीय दोन


परभणीतील देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात

 

एका युवकासह दोन महिला जागीच ठार; नऊ जण जखमी

परभणी (Parbhani devotee accident) :  गंगाखेड येथील राजस्थानमध्ये देवादर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला जयपूर जवळील चोमू येथे अपघात झाल्याने या अपघातात तालुक्यातील हरंगुळ येथील अनुक्रमे ४० व ७५ वर्षीय दोन महिला व लोहगाव येथील एका १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाला असुन नऊ जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती समजल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ व परभणी येथून काही भाविक उज्जैन मार्गे राजस्थानमध्ये खाटूश्याम देवदर्शनासाठी गेले असता बुधवार २७ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भाविकांच्या क्रुजर क्रमांक एमएच २२ यु ००२८ या वाहनाला एका भरधाव वेगातील ट्रक चालकाने हाडौता जवळील बावरिया कट सीकर बायपासवर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथील आदेश राजेश देशमुख वय १८ वर्ष रा. लोहगाव ता. परभणी, मेघा अनिल देशमुख वय ४० वर्ष व शालूबाई प्रल्हाद देशमुख वय ७५ वर्ष रा. हरंगुळ ता. गंगाखेड या तिघांचा जागीच मृत्यु झाला तर गीता सुनिलराव देवधर वय २२ वर्ष, गायत्री सुनिल देवधर वय २२ वर्ष, खुशी बालासाहेब जावळे वय १८ वर्ष, अंकिता रमेश येलफूलकर वय ११ वर्ष, सुनिता सुरेश वय ५४ वर्ष, यशोदा रमेश येलफूलकर वय ४४ वर्ष सर्व रा. परभणी रितेश अनिल देशमुख २२ वर्ष, ऋषिकेश अनिल देशमुख वय २१ वर्ष, शकुंतला अशोक देशमुख वय ७५ वर्ष सर्व रा. हरंगुळ ता. गंगाखेड आदी नऊ जण जखमी झाले आहे. (Parbhani devotee accident) राजस्थान मध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ व परभणी तालुक्यातील लोहगाव या गावात शोककळा पसरली आहे.

राजस्थानचे राज्यपाल बागडे यांनी घेतली जखमींची भेट

देवदर्शनासाठी राजस्थानमध्ये आलेल्या परभणी जिल्ह्यातील भाविकांचा अपघात (Parbhani devotee accident) झाल्याची माहिती समजताच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, सचिव राजकुमार सागर आदींनी रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस करत उपचारासंबंधी तातडीची मदत देण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाला करत मयतांना श्रद्धांजली अर्पण केली.