Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > क्राईम जगत

राधेश्याम गुप्ता मुत्यु

स्वत:चा ट्रक अंगावरून गेल्याने राधेश्याम गुप्ताचा घटनास्थळीच मुत्यु

Radheshyam Gupta Death:


स्वतचा ट्रक अंगावरून गेल्याने राधेश्याम गुप्ताचा घटनास्थळीच मुत्यु

Radheshyam Gupta Death |

 

वेकोलि मेन चेक पोस्ट रस्ता उबळखाबळ व अरूंद उताराचा असल्याने निष्पाप गेला जीव

कन्हान (Radheshyam Gupta Death) : वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथु न कोळसा भरून आणुन मेन चेक पोस्टवर दहाचाकी ट्रक उभा करित ट्रक ऑऊट करण्यास दहाचाकी ट्रक चालक, मालक हा जात असताना त्याचा ट्रक उताराने अचानक सामोर येऊन जोरदार धडक लागुन तो ट्रक खाली पडुन त्याचे अंगावरून दहाचाकी ट्रकची चाके गेल्याने शरिराचा चेंदामेंदा होऊन ट्रक चालक, मालक राधेश्याम गुप्ता याचा दुर्दैवी मुत्य झाला. 
           
गरूवार (दि.२१) मे २०२६ ला वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी खुली कोळसा खदान कोळसा यार्ड मधुन दहाचाकी ट्रक क्रं. एमएच ४० बीजी ०९०१ मध्ये कोळसा भरून येऊन चेक पोस्टवर दुपारी १.३० उभा करून स्वत: ट्रक चालक, मालक राधेश्याम बनवा रीलाल गुप्ता अंदाजे वय ४८ वर्ष रा. वार्ड क्रं.५ हे चेक पोस्ट मध्ये ट्रक आऊट करायला जात असताना अचा नक उताराने ट्रक सामोर आल्याने ट्रक चालकाला धड क लागुन राधेश्याम खाली पडुन उजव्या बाजुचे चाके त्याच्या अंगावरून गेल्याने शरिराचा चेंदामेंदा होऊन ट्रक चालक, मालक राधेश्याम गुप्ता यांचा घटनास्थळीच (Radheshyam Gupta Death) मुत्यु झाला.

बाजुला उभा असलेल्या एका ट्रक चाल काने ट्रक सामोर येत असल्याचे पाहुन वेळीच धाव घेत ट्रकच्या स्टेरिंग सिटवर बसुन ट्रकला ब्रेक मारून थांब विल्याने आणखी सामोर होणारी मोठी दुर्घटना टळली. परंतु तोपर्यत कोळस्याने भरलेल्या दहाचाकी ट्रक चाल क, मालक राधेश्याम गुप्ता याच्या शरिरावरून जाऊन त्यांचा शरिराचा चेंदामेंदा केला होता. घटनेची माहिती कन्हान पोलीसाना मिळताच कन्हान पोस्टे चे हे. कॉ. गुरूप्रकाश मेश्राम पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करून कुणीही मुतदे ह उचलण्यास हिमत करित नसल्याने पोलीसानी सामाजिक कार्यकर्ता व पोलीस मित्र अनिल वासुदेव आंबिलढुके यास बोलावुन भयानक चेंदामेंदा अवस्थे तील मुतदेह व्यवस्थित उचलुन कपडयात बांधुन उत्त रिय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.
         
काम़ठी खुली खदान येथिल मेन चेक पोस्ट चा रस्ता ओबळखाबळ उतरता व अरूंद असल्याने हा ट्रक उताराने अचानक सामोर जाऊन निष्पाप ट्रक चालक, (Radheshyam Gupta Death) मालकाच्या मुत्युस कारणीभुत ठरल्याची तेथे उपस्थित ट्रक चालक, मालक व नागरिकात चर्चा असुन वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी खुली कोळसा खदान येथे सुरक्षा सप्ताह राबवुन सुरक्षेच्या नियमाची काेटेकोरपणे जशी अंमलबजावणी केली जाते. त्याच प्रमाणे दररोज दिवस रात्र हजारो ट्रक ची ज्या मेन चेक पोस्ट वरून नियमित ये-जा असल्याने या चेक पोस्ट चा रस्ता सपाट व रूंद आणि व्यवस्थित बनविण्याची मागणी दबक्या स्वरात होत होती.