Gutkha seller Crime: सेनगाव तालुक्यातील पळशी येथे प्रतिबंधित सुगंधी गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या किराणा दुकानदारावर गोरेगाव पोलिसांनी कारवाई करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोरेगाव (Gutkha seller Crime) : सेनगाव तालुक्यातील पळशी येथे प्रतिबंधित सुगंधी गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या किराणा दुकानदारावर गोरेगाव पोलिसांनी कारवाई करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोरेठाण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राहुल वसंत मैदकर यांना मिळालेल्या माहितीवरून 22 जुलै रोजी पळशी गावातील स्मशान भूमीजवळील सार्वजनिक रोडवर येथे छापा टाकण्यात आला.
या (Gutkha seller Crime) कारवाईत पळशी येथील रहिवासी असलेला मनोज शिवप्रसाद लदनिया व्यवसायाने किराणा दुकान चालक याच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटखा आढळून आला. त्याच्याकडून बिग पॅक केसर युक्त विमल पान मसाल्याचे 40 पुडे ज्यांची किंमत 19 हजार 200 रुपये आहे तसेच व्ही-1 बिग तंबाखूचे 40 पुडे ज्यांची किंमत 800 रुपये आहे असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोग्यास हानिकारक असलेला प्रतिबंधित गुटखा स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या बाळगून विक्रीच्या उद्देशाने नेत असल्याने त्याच्याविरुद्ध गोरेठाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सपोउपनि डाखोरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार ढाकरे हे करत आहेत.