Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

बाभळगाव वाद प्रकरण

परभणीत वाटणीच्या वादातून सख्या भावाचे घर जाळणार्‍यास दोन वर्षाची शिक्षा...?

Babhalgaon dispute case: परभणी जिल्हा न्यायालयाने शेती वाटणीच्या वादातून घर जाळणार्‍या आरोपीला दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.


परभणीत वाटणीच्या वादातून सख्या भावाचे घर जाळणार्‍यास दोन वर्षाची शिक्षा

Babhalgaon dispute case |

 

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील प्रकरण

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

परभणी (Babhalgaon dispute case) : शेती वाटणीच्या वादातून पाचटाच्या आखाड्याला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी शाहू शिवाजी आव्हाड रा. बाभळगाव, ता. पाथरी यांनी पोलीस स्टेशन पाथरी येथे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते की, २६ जुलै २०२० रोजी सायंकाळी शेतीच्या वाटणीच्या कारणावरून आरोपी अशोक शिवाजी आव्हाड याने त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर रात्री फिर्यादी कुटुंबासह शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये असताना आरोपीने घराजवळील पाचटाच्या आखाड्याला आग लावली. या आगीत खताच्या बॅगा, ज्वारी, गहू, बाजरी तसेच सोन्या-चांदीचे दागिने जळून नुकसान झाले.

या (Babhalgaon dispute case) प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोउपनि टी.ई.कोरके यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एन. आर. नाईकवाडे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. आनंद गिराम यांनी बाजू मांडली. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पंच यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक शिवाजी आव्हाड, रा. बाभळगाव, ता. पाथरी यास भादंवि कलम ४३६ अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तसेच कलम ४२७ अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद सुनावली आहे. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. आनंद गिराम यांनी काम पाहिले. तसेच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि सुरेश चव्हाण, पोउपनि दिलीप रेंगे, मपोह वंदना आदोडे आणि पोह सय्यद रहिम यांनी सहकार्य केले.

Related to this topic: