Parbhani police action: परभणी शहरातील शाहूनगर परिसरात पोलीसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत रोख रक्कम जप्त करण्यात आली.
परभणीत मानवी वाहतुक प्रतिबंधीत विभाग, स्थागुशाची संयुक्त कारवाई; दोन महिलांची केली सुटका
परभणी (Parbhani police action) : पाथरी रोड परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, स्थागुशाच्या पथकाने गुरुवार ७ मे रोजी रात्री एक घरात छापा टाकत कारवाई केली. या प्रकरणी एका महिले विरुध्द नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटने बाबत अधिक माहिती अशी की, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सपोनि. अशोक जायभाये यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शाहूनगर परिसरातील स्वतःच्या घरात एक महिला इतर महिलांना बोलावून आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवत होती. यानंतर वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीने सपोनि. अशोक जायभाये, पोउपनि चंदन परिहार, सपोउपनि सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, हिंगलेकर, जाधव, सुर्यकांत फड आदींच्या पथकाने पंच व डमी ग्राहकाच्या मदतीने गुरुवारी रात्री सापळा रचला. डमी ग्राहकाला आरोपीच्या घरात पाठविल्यानंतर मिळालेल्या इशार्यावरून रात्री सुमारे ९.४५ वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी दोन महिला तेथे आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, तेथील अक्का हिने वेश्या व्यवसायासाठी घर उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. छाप्यात रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तसेच घरातून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर (Parbhani police action) पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात एका माहिले विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहेत.
पोलिस अधिक्षक लक्ष देतील का ?
शहरात अनैतिक व्यवसायाविरोधातील कारवाया पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मागील महिन्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक कारवाई झाल्याने शहरात अशा प्रकारचे अवैध व्यवसाय अजूनही सुरू असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, मारहाण, अवैध धंदे आदी छोट्या-मोठ्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यामुळे नुकतेच जिल्ह्याला लाभलेले पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे या वाढत्या गुन्हेगारीकडे विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करतील का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.