Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

परभणी अवैध वेश्या व्यवसाय

परभणीत लोकनाट्य कला केंद्राच्या नावाआड अवैध वेश्या व्यवसाय; स्थागुशाची कारवाई....!

Parbhani illegal prostitution: परभणीतील गंगाखेड येथे लोकनाट्य कला केंद्राच्या नावाखाली चालणार्‍या अवैध वेश्या व्यवसायावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे


परभणीत लोकनाट्य कला केंद्राच्या नावाआड अवैध वेश्या व्यवसाय स्थागुशाची कारवाई

Parbhani illegal prostitution |

 

गंगाखेच्या पती - पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल...!

परभणी (Parbhani illegal prostitution) : गंगाखेड  शहरापासून जवळच शिवाजीनगर परिसरात परळी रस्त्यावर असलेल्या श्री जयभवानी लोकनाटय कलाकेंद्रावर कलाकेंद्राच्या नावाआड अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ मे रोजी रात्री उशिराने छापा टाकून केलेल्या कारवाईत देहविक्री करणाऱ्या महिलेची सुटका करत रविवार १० मे रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात कलाकेंद्र चालक पती - पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे शनिवार ९ मे रोजी त्यांच्या कार्यालयात असतांना गंगाखेड शहरालगत परळी रस्त्यावर असलेल्या श्री जयभवानी लोकनाटय कलाकेंद्रात या कला केंद्राचा मालक विशाल दिलीप अंधारे व त्याची पत्नी अश्विनी विशाल अंधारे हे स्वतःच्या फायद्यासाठी कलाकेंद्राच्या नावाआड अवैध वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने याबाबतची माहिती पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना देत त्यांची परवानगी घेऊन. शनिवार ९ मे रोजी रात्री उशिराने पोनि विवेकानंद पाटील, दैठणा पोलीस ठाण्याचे सपोनि सोनेत, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अशोक जायभाये, पोउपनि चंदनसिंह परिहार, सपोउपनि सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, पोह दुधाटे, पोह सचिन भदर्गे, पोह सय्यद उमर, पोह फारुखी, पोह माणिक वाघ, पोना क्षिरसागर, पोकॉ ढगे, पोकॉ शरद सावंत, मपोशि  थडवे तसेच अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील मपोह हिंगलेकर, मपोह मालसमींदर, मपोशि जाधव यांच्यासह गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांना कारवाईची माहिती देत शनिवार ९ मे रोजी रात्री उशिराने श्री जयभवानी लोकनाटय कलाकेंद्रात बनावट ग्राहक पाठवून छापा मारत देहविक्री करणाऱ्या २५ वर्षीय महिलेला बनावट ग्राहकासोबत रंगेहाथ पकडले.

तेंव्हा श्री जयभवानी लोकनाट्य कलाकेंद्राचे मालक विशाल अंधारे व त्यांची पत्नी अश्विनी अंधारे हे स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरील महिलांना बोलावून घेत त्यांच्याकडून कला केंद्राच्या नावाआड वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आल्याने स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद बलभिम पाटील वय ४४ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात विशाल अंधारे व अश्विनी अंधारे या पती - पत्नी विरुद्ध स्त्रिया व मुली (Parbhani illegal prostitution) अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Related to this topic: