Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

अल्पवयीन युवती अपहरण

परभणीत अल्पवयीन युवतीचे अपहरण; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Minor Girl Abduction: परभणीच्या गंगाखेड तालुक्यात अल्पवयीन युवतीचे अपहरण झाल्याची घटना. घटना १० एप्रिल रोजी घडली व २२ एप्रिल रोजी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


परभणीत अल्पवयीन युवतीचे अपहरण अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल 

Minor Girl Abduction |

परभणी (Minor Girl Abduction) : गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन युवतीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी बुधवार २२ एप्रिल रोजी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकणारी माखणी येथील १७ वर्ष ३ महिने २२ दिवस वय असलेली अल्पवयीन युवती कॉम्प्युटर क्लाससाठी शुक्रवार १० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरात आली व त्यानंतर ती गावाकडे परत गेलीच नाही ही बाब युवतीच्या आईने मंगळवार १४ एप्रिल रोजी मुंबई येथून गावी परतलेल्या पतीस सांगितली तेंव्हा अल्पवयीन युवतीचा तिच्या मैत्रिणीकडे तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र ती मिळून आली नसल्याने बुधवार २२ एप्रिल रोजी अल्पवयीन युवतीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध (Minor Girl Abduction) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील सपोनि शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.

Related to this topic: