Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

परभणी अट्टल गुन्हेगार

परभणीत पाच वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार ताब्यात

Parbhani's notorious criminal: सोनपेठ  गंगाखेड पोलीस ठाणे हद्दित झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींचा शोध घेताना पाच वर्षापासून फरार असलेला घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक


परभणीत पाच वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार ताब्यात

Parbhani's notorious criminal |

 

घरफोडी, चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...!

परभणी (Parbhani's notorious criminal) : सोनपेठ  गंगाखेड पोलीस ठाणे हद्दित झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींचा शोध घेताना पाच वर्षापासून फरार असलेला घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. संबंधिताजवळून दागिने, रोख रक्कम मिळून ४ लाख २ हजार ५५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या चौकशीत घरफोडी आणि चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. पुढील तपासासाठी आरोपीस गंगाखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने तसेच स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार महेश कौठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, गजानन क्षिरसागर, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, जयश्री आव्हाड, उत्तम हनवते यांच्या पथकाने कारवाई केली. गोपनीय माहितीवरुन उक्कडगाव शिवारात कारवाई करण्यात आली. आरोपी सचिन उर्फ बबड्या बापुराव उर्फ बाळू भोसले हा दुचाकीवरुन लिंबा गावाकडे जात असताना त्याला पकडण्यात आले. विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर संबंधिताने गंगाखेड, सोनपेठ, पालम, पूर्णा तसेच परळी तालुक्यात जायक्या तुकाराम शिंदे, सुर्‍या उर्फ श्रीकांत चव्हाण, छोटा मोहन भोसले यांच्या सोबत मिळून घरफोड्या केल्याचे सांगितले.संबंधिता जवळून सोन्या- चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.