Parbhani Youth Death: गंगाखेड तालुक्यातील स्वता:चालवत असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली आल्याने चालकाचा मृत्यू झाला.
गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी येथील घटना
परभणी (Parbhani Youth Death) : गंगाखेड तालुक्यातील स्वता:चालवत असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली आल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १३ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी शिवारात घडली. सदर प्रकरणी पिंपळदरी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्तात्र्य बाबुराव कातकडे वय २५ वर्ष असे मयताचे नाव आहे. ज्ञानोबा कातकडे यांनी खबर दिली आहे. दत्तात्र्य हा ट्रॅक्टर चालवत असतांना ट्रॅक्टर पलटी झाले. सदर ट्रॅक्टरच्या खाली आल्याने गंभीर जखमी होऊन दत्तात्र्य कातकडे यांचा मृत्यू झाला. पिंपळदरी पोलीसात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तापस करत आहेत.
मद्यपी अवस्थेत घेतला गळफास
परभणी : मद्यपी अवस्थेत एका ४५ वर्षीय इसमाने गळफास घेतला. यात संबधीताचा मृत्यू झाला. ही (Parbhani Youth Death) घटना १३ मे रोजी दुपारी ३:४५ च्या सुमारास परभणी शहरातील कडबीमंडी भागात घडली. शिवाजी जाधव यांनी खबर दिली आहे. सुनिल बाबुराव जाधव वय ४५ वर्ष असे मयताचे नाव आहे. नानलपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोना.पोले करत आहेत.