Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

परभणी लाच प्रकरण

परभणीत वाहतूक निरीक्षक शेलारला लाच प्रकरणात अटक...?

Parbhani Bribery Case: परभणीत वाहतूक निरीक्षक रतन शेलार यांना ५०० रुपयाच्या लाचेसाठी अटक केली गेली. लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईमध्ये त्यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली.


परभणीत वाहतूक निरीक्षक शेलारला लाच प्रकरणात अटक

Parbhani Bribery Case |

५०० रुपयाची लाच स्वीकारली; लाच लुचपत विभागाची कारवाई

परभणी (Parbhani Bribery Case) : लग्नाला जायचे, रजा द्या, अशी मागणी केली असता वाहतूक निरीक्षक रतन नामदेव शेलार यांनी ५०० रुपयाची मागणी केली. लाच स्वीकारल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने वाहतूक निरीक्षकास अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. 

राज्य परिवहन महामंडळ परभणी आगारातील एका वाहन चालकास एक दिवसाची रजा पाहिजे होती. त्या चालकास एका मित्राच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ही रजा मागितली होती. परंतु रजा मंजूर करण्यासाठी वाहतूक निरीक्षक रतन शेलार यांनी ५०० रुपयाची मागणी केली. (Parbhani Bribery Case) मागणीनंतर चालकाने परभणी येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली. गुरुवार १६ एप्रिल रोजी पंचाच्या समक्ष लाचेची मागणी व लाच स्वीकारली.

लाच (Parbhani Bribery Case) ही शेलार यांनी वाहतूक निरीक्षक यांच्या कक्षातच स्वीकारल्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर शेलार यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली. पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीषा पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Related to this topic: