Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

परभणी स्टील घोटाळा

परभणीत समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा स्टील घोटाळा

Parbhani Steel Scam: परभणीमध्ये समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आवश्यक स्टील पुरवठ्यात भ्रष्टाचार उघडकीस आला, ज्यात कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.


परभणीत समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा स्टील घोटाळा

Parbhani Steel Scam |

 ट्रेलरमधून स्टीलचा कमी पुरवठा, चालकासह वाहतुक कंपनीविरुध्द फसवणूकीचा गुन्हा...!

परभणी (Parbhani Steel Scam) :  येथे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी येणार्‍या स्टील पुरवठ्यात मोठा घोटाळा उघडकीस आला असून, लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटने बाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गाच्या जालना-नांदेड मार्गाच्या बांधकामासाठी स्टील पुरवठा करणार्‍या ट्रेलरमधून मुद्दाम कमी स्टील आणून कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार १५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी उदित राकेश जैन  सहायक प्रशासकीय प्रबंधक, पीएनसी इन्प्रâाटेक लिमिटेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Steel Scam) फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडकडून नागपूर येथून स्टील पुरवठा केला जात होता. हा माल सुनिता रोड कॅरीयर्स प्रा. लि. जयपूर या वाहतूक कंपनीमार्फत परभणी येथील प्लांटवर आणला जात होता. १५ मार्च रोजी आलेल्या तीन ट्रेलरपैकी दोन ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात स्टील कमी असल्याचे वजन करताना आढळून आले.

वाहन क्रमांक जीजे ०५ बीझेड ०८७१ मध्ये सुमारे ११.३४ टन तर एमएच ४० सीएम ७००७ मध्ये ८.८४ टन स्टील कमी असल्याचे समोर आले. या (Parbhani Steel Scam) प्रकारानंतर चालक फैजान, मुरारी व संजय शाहू हे घटनास्थळावरून पसार झाले.   तसेच तिसर्‍या ट्रेलरचा क्रमांक एमएच ४० सीडी ७५४६ असून, त्यातील स्टीलचे वजन न करता चालकाने वाहन सोडून पलायन केले. याबाबत पुढील चौकशीत, वे-ब्रिजमध्ये तांत्रिक छेडछाड करून आणि संगनमताने स्टील कमी दाखवून कंपनीची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी उदित राकेश जैन यांच्या फिर्यादीवरुन  सुनिता रोड कॅरीयर्सचे राघव चौधरी, एम. डी. हुसैन उर्फ गोलू, तसेच ट्रेलर चालक फैजान, मुरारी, संजय शाहू आणि वे-ब्रिज ऑपरेटर हरीशंकर शुक्ला व भूपेंद्र सिंह यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारात यापूर्वीही अनेक ट्रेलर्समधून मोठ्या प्रमाणात स्टील कमी पुरवठा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नानलपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर खजे करत आहेत.

Related to this topic: