Parbhani lovers suicide: परभणीच्या पिंपळगाव ठोंबरे शिवारात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
गावात दुर्गंधी सुटल्याने घटना उघड
परभणीच्या पिंपळगाव ठोंबरे शिवारातील घटना
परभणी (Parbhani lovers suicide) : तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे शेतशिवारात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. परिसरात दुर्गंधी पसरल्याने सदर घटना तीन, चार दिवसापूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे शिवारात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. काही ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आला. (Parbhani lovers suicide) एका महिला व पुरुषाने एकाच, ओढणीच्या साह्याने झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. मंगळवार २१ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घटनेची माहिती दैठणा पोलिसांना मिळताच सहपोनि अशोक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम मुंडे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी येथे पाठवले.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार सदर आत्महत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे दिसून येते. मयत तरुणीचे नाव वैष्णवी हरिचंद्र भोसले, रा सुरपिंप्री आणि तरुणाचे नाव सुरज दात रा. पूणे असे आहे. सदर घटनेची नोंद घेण्याचे काम दैठणा पोलीस करत आहेत. (Parbhani lovers suicide) घटनास्थळास पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे, स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील, सपोनि. जायभाये आदींनी भेट दिली. प्रेमी युगुलाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र परिसरात उलटसुटल चर्चेला उधाण आले आहे.