Parbhani Police Action: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील तांबुळगाव येथे गुटख्याच्या साठ्यावर कारवाई केली. पोलिसांनी १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडला
१ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त
परभणी (Parbhani Police Action) : पालम येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील तांबुळगाव येथे गुटख्याच्या साठ्यावर कारवाई केली. पोलिसांनी १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थागुशाचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत असताना या पथकाला तांबुळगाव ता. पालम येथील गोविंद उंदरे यांच्या शेत परिसरात गुटखा असल्याची माहिती मिळाली. यावरुन छापा टाकत पोलिसांनी गुटखा, पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ आदीचा साठा जप्त केला आहे. (Parbhani Police Action) सदर प्रकरणात स्थागुशाचे अंमलदार माणिक वाघ यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर उर्फ माऊली बाबर रा. आष्टूर ता. लोहा जि. नांदेड याच्यावर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. मंजूषा मोरे करत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.