Parbhani Travel-Bike Accident: परभणी महसुलातील चार तरुणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग ६१वर एन.एल. ०१ बी. १३७४ क्रमांकाची ट्राव्हल्सने दुचाकीला धडक दिली. मृतदेह वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
राष्ट्रीय महामार्ग ६१ वर मानवत येथील राहुल जिनिंग समोर अपघात
परभणी (Parbhani Travel-Bike Accident) : परभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणार्या भरधाव वेगातील खाजगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मानवत येथील चार तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ६१ वर राहुल जिनिंग समोर शुक्रवार २९ मे रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी ट्रॅव्हल्स चालका विरोधात मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या (Parbhani Travel-Bike Accident) अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, परभणीहुन एन.एल. ०१ बी. १३७४ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स पुण्याकडे जात होती. मानवत जवळ अंधारवड मारोती मंदिराच्या कमानी समोर या ट्रॅव्हल्सने एम.एच. २२ बी.बी. ४७२४ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रल्हाद अशोक कुटे वय २७ वर्ष, विष्णू गोरे वय २६ वर्ष, नवनाथ जाधव वय ३० वर्ष, शुभम दहे वय २७ वर्ष या तरुणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच सपोनि. संदीप बोरकर, पोउपनि. किशन पतंगे, प्रमोद देवकते, ज्ञानेश्वर चोपडे, सय्यद फयाज यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शनिवार ३० मे रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मानवत येथील वैकुंठधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील चार तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.