Parbhani knife attack: परभणीच्या सेलूमध्ये किरकोळ वादातून दोघांवर चाकूने हल्ला करून एक जण मृत्यु पावला तर दुसरा गंभीर आहे. पोलिसांनी अद्याप गून्हा नोंदवलेला नाही.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू तर एक गंभीर
अद्यापही सेलू पोलिसात गून्ह्याची नोंद नाही...!
परभणी (Parbhani knife attack) : सेलू शहरातील गायत्री नगर येथे किरकोळ वादातून दोघांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले यामध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यु झाला तर दूसरा गंभीर आहे.सदरिल घटना गूरूवार मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान घडली असून या (Parbhani knife attack) प्रकरणी अद्यापही गून्हा नोंद करण्यात आला नाही.घटनेचे सविस्तर वृत असे की,गायत्री नगर येथे किरकोळ वादातून आनंद दगडू ढोले(वय ३०)व आदित्य मिलिंद प्रधान (वय २२) या दोघांवर चाकूने वार करून जखमी करण्यात आले आनंद याच्या छातीत वार तर आदित्य याच्या कमरेवर वार करण्यात आला होता.
दोघांनाही उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र (Parbhani knife attack) प्रकृती खालावत असल्याने पूढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवत आले.आदित्य प्रधान याच्या किडनीला मार लागल्याने त्याला पूढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले. दरम्यान शूक्रवार दूपारी २:३० वाजता आदित्य प्रधान याचे निधन झाले तर आनंद ढोले याची प्रकृती गंभीर असून त्याच्या वर रूग्णालयात उपचार सूरू असून आदित्य प्रधान यांच्या नातेवाईकांनी खूनचा गून्हा नोंदवावा अशी मागणी केली असून अद्यापही या प्रकरणी गून्हा दाखल करण्यात आला नसून सध्या आरोपी मोकाट फिरत आहेत.