Parbhani Hospital case: परभणी येथे खाजगी रुग्णालयात वादातून एका तरुणास रस्त्यात थांबवून कोयत्याने जखमी करण्यात आले. याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
दोघांविरूध्द गुन्हा दाखल; गंगाखेड शहरातील घटना
परभणी (Parbhani Hospital case) : गंगाखेड तालुक्यात माझ्यापुढे नंबर किती आहेत असे विचारल्यावरून खाजगी रुग्णालयात झालेल्या वादातून एका तरुणास रस्त्यात थांबवून कोयत्याने मारून जखमी केल्याची घटना सोमवार २७ एप्रिल रोजी रात्री शहरात घडली. याप्रकरणी सोमवार ४ मे रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, (Parbhani Hospital case) गंगाखेड शहरातील क्रांतीनगर भागातील रहिवासी संदेश शिवाजी कामत वय २८ वर्ष हे त्यांच्या भावजयीला उपचारासाठी सोमवार २७ एप्रिल रोजी दुपारी एका खाजगी रुग्णालयात गेले असता त्यांनी रुग्णालयात असलेल्या रितेश साळवे यास माझ्यापुढे किती नंबर आहे असे विचारल्यावरून संदेश कामत व रितेश साळवे यांच्यात वाद झाला होता. त्याच दिवशी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास संदेश कामत व त्यांचा मित्र कृष्णा गिराम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातून घराकडे जात असतांना रस्त्यावर थांबलेल्या रितेश साळवे याने आवाज देऊन थांब म्हटल्याने दुचाकी थांबवून खाली उतरताच रितेश साळवे व त्याचा भाऊ तुषार साळवे जवळ आले.
रितेश साळवे याने दुपारी मला शिव्या दिल्या आता याला खल्लास करून टाकू असे म्हणत शिवीगाळ करून तुषार साळवे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मानेवर वार केला तेंव्हा हा वार चुकविण्यासाठी संदेश कामत याने उजवा हात पुढे केल्याने कोयत्याचा वार हातावर लागून मनगटाजवळ गंभीर जखम झाल्याची फिर्याद संदेश शिवाजी कामत यांनी सोमवार ४ मे रोजी रात्री (Parbhani Hospital case) गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरुन रितेश साळवे व तुषार साळवे या दोघांविरुद्ध जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि.शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.