Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > क्राईम जगत

परभणी दवाखाणा नुकसान प्रकरण

परभणीत दवाखाण्याचे नुकसान केल्याप्रकरणी एक वर्ष साधी कैद व पाच हजार रुपये दंड

Parbhani Hospital Damage Case: गंगाखेड येथील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरच्या दवाखाण्याचे नुकसान केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली आरोपीची शिक्षा कायम


परभणीत दवाखाण्याचे नुकसान केल्याप्रकरणी एक वर्ष साधी कैद व पाच हजार रुपये दंड

Parbhani Hospital Damage Case |

 

कनिष्ठ न्यायालयाने दिलेली आरोपीची शिक्षा कायम

परभणी (Parbhani Hospital Damage Case) : गंगाखेड येथील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरच्या दवाखाण्याचे नुकसान केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली आरोपीची शिक्षा कायम ठेवत जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरीक्त सत्र न्यायाधीशांनी एक वर्ष साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील योगेश्वर कॉलनी परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. खाजा खाँ युसुफ खॉ यांच्या दवाखान्यात सय्यद अर्शद सय्यद दाऊद रा. ममता कॉलनी गंगाखेड यांनी धिंगाणा करून दवाखाण्याचे नुकसान केल्याप्रकरणी १६ मे २०१० रोजी दिलेल्या तक्रारीवरून गंगाखेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक २ यांनी वरील तक्रारीवरुन दवाखान्यात येवुन  आरोपी सय्यद अर्शद सय्यद दाऊद रा. ममता कॉलनी गंगाखेड यांना एक वर्ष साधी कैद व वैद्यकीय व्यवसाय मालमत्ता नुकसान प्रकरणी पाच हजार रूपये दंड व फिर्यादीस नुकसान भरपाई चार हजार रुपये देण्याची शिक्षा ठोठावली होती.

या शिक्षेच्या विरुध्द आरोपीने जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम सुंदाळे यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपीलात दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम सुंदाळे यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली आरोपीची शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील डी. यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. डी. वाकोडकर यांचा युक्तीवाद मान्य करुन शिक्षा कायम ठेवली. त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. बी. पौळ, गंगाखेड कोर्ट पैरवीकार मपोशि स्नेहल एस. जिंकलवाड, कोर्ट पैरवीकार श्री एम. डी. कुंडगीर, मपोह श्रीमती एल. व्ही. मुंढे यांनी सहकार्य केले.