Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

परभणी हायवा अपघात

परभणीत हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

Parbhani Highway Accident: परभणीतील गंगाखेड-परळी महामार्गावर हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण अवधूत भास्कर शिंदे जागीच ठार झाला. या घटनेचा तपास आदित्य लोणीकर करत आहेत.


परभणीत हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

Parbhani Highway Accident |

परभणीतील गंगाखेड-परळी महामार्गावरील घटना...!

गंगाखेड (Parbhani Highway Accident) : तालुक्यात भरधाव वेगातील हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवार १९ एप्रिल रोजी रात्री उशिराने गंगाखेड ते परळी रस्त्यावरील वंदन पाटीवर घडली. यातील मयत तरुणाचे नाव अवधूत भास्कर शिंदे असे आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की,  गंगाखेड शहरात कटींग सलूनचे दुकान चालवून रविवार १९ एप्रिल रोजी रात्री फॅशन प्रो दुचाकी क्रमांक एमएच २२ बीएल ३७२३ वरून निळा या गावाकडे निघालेल्या अवधूत भास्कर शिंदे वय २५ वर्ष रा. निळा ता. सोनपेठ याच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या हायवाची धडक बसल्याने दुचाकीवरील अवधूत शिंदे हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याच्या पाठीमागे असलेल्या अनंत रघुनाथ शिंदे व गणेश सुग्रीव शिंदे यांनी (Parbhani Highway Accident) अपघाताची घटना पाहून निळा येथून घटनास्थळी चारचाकी वाहन बोलावून घेत बेशुद्ध अवस्थेतील अवधूत शिंदे यास मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पि.आर. चट्टे, परिचारिका माया लाटे, मंजुषा राख, गोविंद वडजे आदींनी तपासून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी राहुल भास्कर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार २० एप्रिल रोजी सकाळी गंगाखेड पोलीस ठाण्यात एमएच २२ एए ६७७७ क्रमांकाच्या हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि आदित्य लोणीकर हे करीत आहेत.

Related to this topic: