Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

हळद बियाणे चोरी प्रकरण

परभणीत हळद बियाणे चोरी प्रकरण उघड; तीघे ताब्यात

Turmeric seed theft case: परभणीतील पिंपरीचे घरातून हळद बियाणे, ट्रॅक्टर व लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पथकाने दोन आरोप्यांना ताब्यात घेतले.


परभणीत हळद बियाणे चोरी प्रकरण उघड तीघे ताब्यात

Turmeric seed theft case |

 

५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल  जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पूर्णा (Turmeric seed theft case) : पूर्णा पोलिस ठाण्यात ६ जून रोजी दाखल असलेल्या हळद बियाणे चोरी प्रकरणाचा अवघ्या पंधरा दिवसात छडा लावत परभणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत  ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयभाये यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी पथक ताडकळस व पूर्णा परिसरात माहिती संकलन करीत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत पूर्णा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या हळद बियाणे चोरी प्रकरणातील आरोपींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अल्केश अमृतराव देशमुख (रा. परभणी) हा (Turmeric seed theft case) आरोपी पिंपरी देशमुख येथे असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने जगन्नाथ माधवराव मोहिते रा. महागाव, ता.पूर्णा, अभिषेक मुंजाजी नाईकवाडे, करण भगवानराव चिमटे व सचिन उर्फ भवर्‍या सुरेश डुकरे सर्व रा. पिंपरी देशमुख यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्या शेतातून चोरीस गेलेले हळदीचे गोल व लांब शेंग असलेले बियाणे तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ५ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून जगन्नाथ मोहिते व अभिषेक नाईकवाडे यांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनीही गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. तिन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी पूर्णा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही (Turmeric seed theft case) कारवाई पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंग परिहार, पोलिस हवालदार रंगनाथ दुधाटे, महेश कवठाळे, सूर्यकांत फड, राहुल परसोडे, माणिक वाघ तसेच पोलिस शिपाई हनुमान ढगे, शरद सावंत, निलपत्रेवार आणि कश्यप साने यांच्या पथकाने केली. पूर्णा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच उर्वरित आरोपी ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पूर्णा पोलिस ठाण्याचे पोनि.सचिन बेंद्रे यांनी दिली.

Related to this topic: