Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > क्राईम जगत

अवैध गुटखा कारवाई

परभणीत अवैध गुटख्यावर पोलीसांची कारवाई ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त...!

Illegal gutkha action: महाराष्ट्रातील परभणी येथे ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात जप्ती केली, एकूण १३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


परभणीत अवैध गुटख्यावर पोलीसांची कारवाई  १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal gutkha action |

ग्रामीण पोलीस, पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाची संयुक्त कारवाई...!

परभणी (Illegal gutkha action) : महाराष्ट्र शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातलेली असताना परभणी ग्रामीण पोलिस, उपमहानिरीक्षक यांच्या संयुक्त पथकाने पेडगाव परिसरात कारवाई करत सुमारे ६ लाख ५८ हजाराच्या अवैध गुटख्यासह १३ लाख ५८ हजारांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. दोन व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,    ग्रामीण पोलिसांनी गुरुवार १६ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पेडगावजवळील हॉटेल इंपिरीअल पार्क परिसरात कारवाई केली. संशयावरून महिंद्रा बुलेरो मॅक्स पिकअप एमएच २२ एएन ५५१४ या वाहनाची तपासणी केली असता  त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या कारवाईत सुमारे  ६ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा गुटखा  जप्त करण्यात आला.

याशिवाय सुमारे ७ लाख रुपये किमतीचे बुलेरो पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूण जप्तीची किंमत १३ लाख ५८ हजार ८०० रुपये आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पुंडलीक मोहिते यांच्या फिर्यादीवरून शेख खालेद शेख वली  व सय्यद मुबीन हास्मी  या (Illegal gutkha action) दोघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत.

Related to this topic: