Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

परभणी इसमाचा खून

परभणीत शेत जमीनीच्या वादातून धारदार शस्त्राने मारुन वृद्ध इसमाचा खून

Parbhani Murder Case: गंगाखेड येथील गौडगावचा भाऊसाहेब जाधव यांचा शेत जमीनीच्या वादातून झालेला खुणा. रविवार दुपारी त्यांना मारुन गंभीर जखम झाल्या.


परभणीत शेत जमीनीच्या वादातून धारदार शस्त्राने मारुन वृद्ध इसमाचा खून

Parbhani Murder Case |

 

गंगाखेड  तालुक्यातील ब्रम्हनाथवाडी शिवारातील घटना

परभणी (Parbhani Murder Case) : गंगाखेड  येथील शेत जमीनीच्या वादातून धारदार शस्त्राने मारून गौडगाव येथील वृद्ध इसमाचा खून झाल्याची घटना रविवार १४ जून रोजी दुपारी गंगाखेड तालुक्यातील ब्रम्हनाथवाडी शिवारात घडली. घटनास्थळी गौडगाव येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील गौडगाव येथील भाऊसाहेब किशनराव जाधव वय ६३ वर्ष यांच्या ब्रम्हनाथवाडी शिवारात असलेल्या शेत जमीनीचा वाद मागील काही वर्षांपासून शेत शेजार्‍यांसोबत सुरु होता. रविवार १४ जून रोजी दुपारी भाऊसाहेब जाधव शेतात असतांना शेत शेजारी शेता जवळील खांब ओढीत नेत असल्याचे त्यांनी गावात फोन करून मुलाला व नातेवाईकांना सांगत, लवकर शेतात या, असे म्हटले असता त्यांचा मुलगा व नातेवाईक शेतात आले तेंव्हा भाऊसाहेब जाधव हे (Parbhani Murder Case) गंभीर जखमी अवस्थेत शेत धुर्‍याजवळ शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

त्यांनी याची माहिती सोनपेठ पोलिसांना दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक अशोकराव गिते, पोउपनि अजय किरकन, भूषण कांबळे, पोह सुनिल गिरी, राजेश मस्के, पो.शि. भागवत हुंडेकर, पो.शि. हनुमंत पौळ, चालक गणेश नाटकर, शेख कलिंदर आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. दुपारी अंदाजे १२:३० वाजेच्या सुमारास खुनाची घटना घडल्यानंतर दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. (Parbhani Murder Case) याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

डोक्यात पाठीमागून खोलवर वार
शेत जमीनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या घटनेत भाऊसाहेब जाधव यांच्या डोक्यात पाठीमागून धारदार शस्त्राने खोलवर वार करून तसेच डोळ्याजवळ मारून गंभीर जखमी केल्याचे दिसले. या घटनेतील आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असता आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे वेगवेगळे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांनी नातेवाईकांना दिली.