Gangakhed Burglary Case: परभणी शहरातील गंगाखेडमध्ये घरफोडीची घटना घडली. चोरट्याने ७४ हजाराचे सोन्याचे दागिणे लंपास केले आणि सीसीटिव्हीत कैद झाला.
गंगाखेड शहरातील घटना जवळपास ७४ हजाराचा मुद्देमाल लंपास...!
परभणी/ गंगाखेड (Gangakhed Burglary Case) : शहरातील सारडा कॉलनी परिसरातील शिक्षकाचे कुटुंब नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याचा फायदा घेत भर दुपारी घरफोडी करून सोन्याचे दागिणे लंपास करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. घटना शनिवार ९ मे रोजी घडली. या (Gangakhed Burglary Case) प्रकरणी रविवार १० मे रोजी रात्री उशिराने अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सोनपेठ तालुक्यातील पोहंडूळ तांडा जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले संजीवकुमार व्यंकटराव गबाळे हे कुटुंबासह गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी परिसरात राहतात. (Gangakhed Burglary Case) नातेवाईकांच्या घरी लग्न असल्याने शनिवार ९ मे रोजी सकाळी ८ वाजता गबाळे यांचे कुटुंब लग्न कार्यासाठी नांदेड येथे गेले होते. सायंकाळी ६ वाजता गंगाखेड येथे परत आले असता त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कुलूप कोंडा तुटलेला दिसला.
तेंव्हा त्यांनी घरात जाऊन पाहीले असता कपाटातील साहित्य व सोन्याचे दागिणे ठेवलेला प्लास्टिकचा डबा अस्तव्यस्त स्थितीत पडलेला दिसल्याने डबे उघडून पाहिले असता डब्ब्यात ठेवलेली ४ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी, २ ग्राम वजनाचे मनी मंगळसूत्र, २ ग्राम वजनाची सोन्याची वेल व ३.५ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असे एकुण ११.५ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिणे (अंदाजे किंमत ७४ हजार २५३ रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दिसले. या (Gangakhed Burglary Case) प्रकरणी संजीवकुमार व्यंकटराव गबाळे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवार १० मे रोजी रात्री उशिराने अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.