Parbhani Bike theft: परभणीत एका दुचाकीस्वाराने अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिली आणि त्याने त्याची दुचाकी व मोबाईल चोरून पळ काढला. जिंतूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केली.
हिंगोली जिल्ह्यातून चोरट्यास घेतले ताब्यात जिंतूर पोलिसांची कामगिरी
परभणी (Parbhani Bike theft) : जिंतूर तालुक्यातील एका दुचाकीस्वाराला अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले. मैनापूरी पाटीवर हात दाखवून जिंतूर शहरात सोडा म्हणणार्या भामट्याने बोलबच्चन करत दुचाकीस्वाराला जेवणासाठी नेले. मात्र तो दुचाकीस्वार जेवणाची ऑर्डर देत असताना भामट्याने त्यांची दुचाकी (Parbhani Bike theft) व मोबाईलसह पोबारा केला. मात्र जिंतूर पोलिसांनी त्याचा शोध काढून भामट्याला ताब्यात घेतले.याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,जालना जिल्ह्यातील विलास जनार्धन पवार हे ४ जुलै २०२ ५ परभणीहून त्यांच्या एमएच -२१ सीई - ९२७५ या क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात होते. मैनापूरी पाटीजवळ जय सेवालाल म्हणून एका इसमाने त्यांना हात दाखवला. जिंतूरपर्यंत सोडण्याची विनंती केली.
माणूसकीच्या नात्याने विलास पवार यांनी त्या इसमाला लिफ्ट दिली. (Parbhani Bike theft) जिंतूरमध्ये आल्यानंतर त्या इसमाने दारु पिण्याच्या बहाण्याने पवार यांना एका दुकानात केले. त्यानंतर जेवण करण्यासाठी गल्लीतील एका हॉटेलात नेले. विलास पवार हे जेवणाची ऑर्डर देत असताना इसम संधी साधून त्यांची दुचाकी व गाडीत ठेवलेला मोबाईल पसार झाला. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध घेतला. मिळालेल्या माहिती नुसार आरोपी गजानन सुभाष जाधव, २६ वर्ष रा. जांब ता.सेनगावक हिंगोली या तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त केली. ही कारवाई अंमलदार दिपक वाटोडे, सुनिल राठोड यांच्या पथकाने पार पाडली. त्यांना सायबर सेलचे गणेश कौटकर, स्वप्निल पोतदार यांची तांत्रिक मदत मिळाली.