Parbhani youth Death: मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे सोमवार रात्री कंटेनर चालकाने भरधाव वेगात धडके दिली. यामुळे २० वर्षाचा तरूण मृत झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील घटना वाहनचालकावर गुन्हा
परभणी (Parbhani youth Death) : मानवत तालुक्यात भरधाव वेगातील कंटेनर चालकाने दिलेल्या धडकेत २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवार ८ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पाथरी - पोखर्णी रोडवरील केकर जवळा शिवारात घडली. सदर प्रकरणी (Parbhani youth Death) कंटेनर चालकावर मानवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद खयूम यांनी फिर्याद दिली आहे. सय्यद महेर सय्यद महेबुब वय -२० वर्ष असे मयत तरूणाचे नाव आहे. सय्यद महेर हा तरूण केकरजवळा शिवारात शौचास गेला.
यावेळी भरधाव वेगातील डी.डी.०१ पी ९६०६ या क्रमांकाच्या कंटेनर चालकाने सय्यद महेर, शेख मेहबुब या दोघांना जोराची धडक दिली. जखमींना उपचारासाठी पाथरी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्रथमोपचार करून परभणी येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. (Parbhani youth Death) अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला. त्याला अपघात स्थळावरून दोन किमी अंतरावर पकडण्यात आले. उपचारादरम्यान रात्री ११.३० च्या सुमारास सय्यद महेर याचा मृत्यू झाला. युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालक प्रकाश गणपत राठोड याच्यावर मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.