Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > क्राईम जगत

नानलपेठ पोलीस छापा

गोमांस विक्रीवर नानलपेठ पोलीसांचा छापा

Nanalpet police Raid: परभणी वांगी रोड परिसरात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी छापा टाकला. तिघांना अटक केली गेली आणि मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त.


गोमांस विक्रीवर नानलपेठ पोलीसांचा छापा

Nanalpet police Raid |

परभणी वांगी रोड परिसरातील कारवाई तिघांना अटक

परभणी (Nanalpet police Raid) : शहरातील वांगी रोड  परिसरात गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी  १९ एप्रिल सकाळी छापा टाकून तिघांना ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात गोमांस व साहित्य जप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की,  नानलपेठ पोलीसांना  मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वांगी रोड परिसरातील एका  आईस फॅक्टरीजवळील मटन दुकानात गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.

या (Nanalpet police Raid) माहितीच्या आधारे  नानलपेठ पोलीसांच्या पथकाने  रविवारी  सकाळी ११.३० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये दुकानात मोठ्या प्रमाणात मटन साठवलेले आढळून आले. चौकशीदरम्यान संबंधित मटन हे बैलाचे (गोवंशाचे) असल्याची कबुली आरोपींनी दिली. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी अजय धामगुंडे यांना बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी करून सदर मांस गोवंशाचे असल्याची पुष्टी केली. कारवाई दरम्यान सुमारे १२० किलो गोमांस, मटन कापण्याची साधने, वजन काटा तसेच रोख रक्कम असा एकूण २८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व साहित्य पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले असून नमुने पुढील तपासासाठी जतन करण्यात आले आहेत.

याप्रकरणी (Nanalpet police Raid) नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बालासाहेब केरबाजी लिंगायत यांच्या फिर्यादीवरून प्राणी संरक्षण अधिनियम  महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा  १९७६ व २०१५ सुधारणा अंतर्गत  ५, ५(क), ६, ९ आणि ९(अ) या विविध कलमान्वये   इस्माइल खाजा कुरेशी, खाजा इस्माइल कुरेशी आणि शफी खाजा कुरेशी  यांच्याविरुद्ध शहरातील  नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरणाचा पुढील तपास नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोना.कुटे हे करत आहेत.

Related to this topic: