Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

परभणी बँक चोरी

परभणीत पाथरीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरीचा प्रयत्न; चोरटा सीसीटीव्हीत कैद

Parbhani bank robbery: परभणी पाथरीत बँकेत चोरीचा प्रयत्न झाला. बुधवारी रात्री सीसीटीव्हीवर कैद झालेल्या संशयिताने व्यवस्थापकांच्या केबिनमार्गे कॅशियरच्या टेबलापर्यंत पोहोचला.


परभणीत पाथरीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरीचा प्रयत्न चोरटा सीसीटीव्हीत कैद

Parbhani bank robbery |

 

कुलुपे तोडून बँकेत प्रवेश

परभणी (Parbhani bank robbery) : पाथरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने बँकेतून कोणतीही रोकड चोरीस गेली नसल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली आहे.

गुरुवार ४ जुन रोजी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे कर्मचारी बँक (Parbhani bank robbery) उघडण्यासाठी आले असता चैनल गेट व पहिल्या मजल्यावरील दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर बँकेत अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपव्यवस्थापक व तालुका नियंत्रण अधिकारी दीपक गवारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

घटनेची  माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पाथरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेला एक संशयित बँकेत प्रवेश करताना दिसून आला. त्याने व्यवस्थापकांच्या केबिनमार्गे कॅशियरच्या टेबलापर्यंत पोहोचून चोरीचा प्रयत्न केल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. तसेच बँकेतील इन्व्हर्टर बॅटरीची वायरिंग तोडण्याचाही प्रयत्न केल्याचे आढळले.

दरम्यान चोरटा स्ट्राँग रूमच्या दिशेने गेला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या (Parbhani bank robbery) प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तपासात अडथळा येऊ नये म्हणून बँकेचे व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले होते.

Related to this topic: