Parbhani flyover accident: परभणीत परभणी-मानवत महामार्गावर उड्डाणपुलावर अपघात झाला. दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक चालक जखमी झाला.
मयत तरुण खरबा येथील रहिवासी आयशर चालक जखमी...!
परभणी (Parbhani flyover accident) : मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारातील मानवत परभणी रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलावर एर्टिगा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने लोखंडी कठड्याला धडकून समोरून येणार्या आयशर ट्रकला धडकली समोरासमोर झालेल्या या अपघातात खरबा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार १ जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.?
याबाबत अधिक माहिती अशी की, मानवत तालुक्यातील खरबा येथील गणेश तानाजी निर्मळ वय २६ वर्ष आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली वैजनाथ निर्मळ वय २६ हे एर्टिगा कार क्रमांक एम एच ०६ बि.एम ६११० ने परभणी कडे जात होते. कोल्हा शिवारातील उड्डाण पुलावर कारचालक तरुणाचा ताबा सुटल्याने कार उड्डाण पुलाच्या लोखंडी कठड्याला आदळून परभणी कडून मानवत कडे जाणार्या आयशर क्रमांक एम एच २६ ए. डी. १४०१ ला समोरासमोर जाऊन धडकली अपघात एवढा भीषण होता की कार चक्काचूर होऊन यामध्ये गणेश तानाजी निर्मळ आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली वैजनाथ निर्मळ या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
तर आयशर चालक ईश्वर मोतिराम कोल्हे वय ४५ वर्ष रा मगर सावंगी ता.लोहा जि. नांदेड हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, शितल बोर्डे, पो हा राजू इंगळे, प्रकाश खंदारे, चालक अविनाश डंबाळे यांनी घटना स्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही तरुण आपल्या आई-वडिलांना एकुलते एक होते. अपघात झाल्याचे कळताच कोल्हा येथील अनेक तरुणांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.