Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > क्राईम जगत

परतूर गांजा जप्त

परतूरच्या आरोपीस ४ किलो गांजासह घेतले ताब्यात..!

Paratur ganja seized: पिंगळी-परभणी रोडवर स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला ४ किलो १८० ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले. त्याला पिंगळी स्टेशनवरुन पकडण्यात आले.


परतूरच्या आरोपीस ४ किलो गांजासह घेतले ताब्यात

Paratur ganja seized |

पिंगळी-परभणी रोडवर स्थागुशाची कारवाई परतूरला न जाता आरोपी पिंगळी स्टेशनवरच उतरला

परभणी (Paratur ganja seized) : ताडकळस  येथे परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंगळी ते परभणी   सार्वजनिक रस्त्यावर मंगळवार   २१ एप्रिल  रोजी सायंकाळी धाड टाकून अवैधरित्या गांजा बाळगणार्‍या एका आरोपीला ताब्यात घेतले.  या कारवाईत ४ किलो १८० ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक सुटकेस असा एकूण ८४  हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जगताप यांच्या फिर्यादीवरुन  ताडकळस पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या (Paratur ganja seized) प्रकरणात  एका आरोपीला स्थागुशाच्या पथकाने  पिंगळी शिवारातून ताब्यात घेतले आहे. त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव प्रदिप सिताराम फुलमाळी रा.परतुर असे सांगीतले. सदरील आरोपी हा नांदेड वरुन रेल्वेने परभणीमार्गे जात होता. मात्र परतूर किंवा परभणीत न उतरता पिंगळी रेल्वे स्थानकावरच उतरला व मुख्यरस्त्यावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगताप, सपोउपनि सुग्रीव केंद्रे, सपोउपनि मधुकर चट्टे, सपोउपनि निलेश भुजबळ, पोहेकॉ दुधाटे, पोहेकॉ फड, पोना क्षीरसागर, पोशि ढगे, पोशि रफीयोद्दिन आणि पोलीस चालक हनवते या पथकाने  केली.  स्थागुशाचे सपोउपनि सुग्रीव केंद्रे हे करीत आहेत.

Related to this topic: