Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > क्राईम जगत

परसवाडा अत्याचार प्रकरण

अखेर त्या नराधमाला अटक; एक दिवसाची पोलिस कोठडी

Parswara torture case: तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अपहरण करण्यात आल्याच्या प्रकरणात आरोपी सुमित ऊईकेला पोलिसांनी अटक केली आहे.


अखेर त्या नराधमाला अटक एक दिवसाची पोलिस कोठडी

Parswara torture case |

तिरोडा (Parswara torture case) : तालुक्यातील परसवाडा येथे नराधम युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अपहरण करीत शाळेत डांबल्याची घटना २२ एप्रिल रोजी समोर आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.  दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून फरार असलेल्या आरोपी सुमित देवानंद ऊईके (२१) याचा शोध सुरू केला होता. दरम्यान आज (ता.२३) सकाळी आरोपी सुमित ऊईके पोलिसांच्या हाती लागला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परसवाडा (Parswara torture case) येथील अल्पवयीन पीडित मुलीने लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून सुमित ऊईके या युवकाने  मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडितेचे हात-पाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवले. हा संतापजनक प्रकार २२ एप्रिल रोजी उघडकीस येताच तिरोडा तालुक्यात एकच खळबळ उडाली.  याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘पोक्सो'सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

तपासकार्य गतिमान करून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेणे सुरू केले. आज, २३ एप्रिल रोजी सकाळी आरोपी सुमित ऊईके हा दवनीवाडा पोलिसांना गवसला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली दवनीवाडा पोलिस करीत आहे.

Related to this topic: