Matrimonial suicide case: लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर विवाहितेला हुंड्यासाठी त्रास दिला . याच त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पोखर्णी येथे घडली
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; ही प्रथा कधी बंद होणार
पोखर्णी नृ. येथे विवाहितेने घेतला होता गळफास...?
परभणी (Matrimonial suicide case) : दैठणा येथे लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर विवाहितेला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ जुलै रोजी पोखर्णी येथे घडली होती. या प्रकरणात विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या मंडळीवर ६ जुलै रोजी हुंडा बंदी अधिनियम, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
बशीर जलाल अहेमद कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलगी अर्शिया हिचे लग्न पोखर्णी येथील युवकासोबत झाले होते. (Matrimonial suicide case) लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. व्यवसायासाठी वारंवार पैशांची मागणी केली होत होती. मुलीला त्रास होऊ नये, यासाठी थोडेथोडे करत दहा ते बारा लाख रुपये सासरच्या मंडळींना देण्यात आले. तरी देखील त्रास कमी झाला नाही.
तुझ्या वडिलांकडून १ लाख ६० हजार रुपये हुंडा घेऊन ये म्हणत विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला. याच (Matrimonial suicide case) छळाला कंटाळून अर्शिया हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दस्तगीर रसूल कुरेशी, जिलानी रसूल कुरेशी, महेबुब रसूल कुरेशी, सुमय्या जिलानी कुरेशी, रिजवाना महेबुब कुरेशी यांच्यावर दैठणा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.