Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

औंढा नागनाथ अवैध गुटखा

औंढ्यात मुंडे पॅटर्नचा धसका: अवैध गुटख्याची दोन पोती रस्त्यावर फेकून आरोपी फरार, पोलिसांकडून जप्त

Aundha Nagnath illegal gutkha: ऑंढ्यात अवैध गुटखा विक्रेत्यांनी 'मुंडे पॅटर्न'च्या धसक्यात दोन पोत्या फेकून पळताना पोलिसांनी जप्त केले. शिक्षक कॉलनीच्या ठिकाणावर घटी मोजल्या जात आहे.


औंढ्यात मुंडे पॅटर्नचा धसका अवैध गुटख्याची दोन पोती रस्त्यावर फेकून आरोपी फरार पोलिसांकडून जप्त

Aundha Nagnath illegal gutkha |

औंढा नागनाथ (Aundha Nagnath illegal gutkha) : येथे अवैध गुटखा विक्रेत्यांनी तुकाराम मुंडे पॅटर्नचा धसका घेतला असून शिक्षक कॉलनी भागातील कनकेश्वरी मंदिर रोड लगत अवैध गुटख्याची दोन पोते अज्ञात व्यक्तीने फेकून देऊन पळ काढल्याची घटना दिनांक १९ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणाची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार संतोष पवार व एजाज पटेल यांनी पाहणी केली असता तिथे 'गोवा' नावाचा गुटखा भरलेली दोन पोती आढळून आली.

पोलिसांनी सदर गुटखा जप्त करून पोलीस ठाण्यात आणला आहे. त्याची मोजणी करून या (Aundha Nagnath illegal gutkha) प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुटखा फेकून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान मुंडे पॅटर्नमुळे औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात गुटखा माफीयांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जमा केलेला अवैध गुटखा फेकून दिला जात आहे. फेकून दिलेला गुटखा जप्त करून संबंधित माफीयांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी सांगितले.

Related to this topic: