Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

हिंगोली गुन्हा

नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणातून वाद;दोघांना खंजीरने भोसकले

Hingoli Crime: हिंगोलीत विवाह सोहळ्यात नवरदेवाच्या बुटावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली. चार जणांवर गुन्हा दाखल.


नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणातून वाददोघांना खंजीरने भोसकले

Hingoli Crime |

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

खानापूर चित्ता (Hingoli Crime) : हिंगोली तालु्क्यातील खानापूर चित्ता पासून जवळच असलेल्या  कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे.

या (Hingoli Crime) घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी  २८ एप्रिल रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपुर्वी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वसमत तालुक्यातील गिरगाव ये्थील काही वर्‍हाडी मंडळी विवाह सोहळ्यासाठी आली होती. यावेळी विवाह सोहळा सुरळीत पार पडत असतांना नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून काही वर्‍हाडी मंडळीमध्ये वादाला तोंड फुटले होते. मात्र इतर मंडळींनी समजावून सांगितल्यानंतर वाद मिटला होता. त्यानंतर विवाह सोहळा पार पडला.मात्र बुट लपविण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी पुन्हा वाद उकरून काढत गणेश डाळ यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

या मारहाणीमध्ये त्यांच्या पोटात खंजीरने वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे ते खाली पडले. सदर प्रकार सोडविण्यासाठी श्रावण गाढवे हे मध्ये पडले असता चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याही पोटात खंजरने वार करून जिवे मारण्याची प्रयत्न केला.यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये गजानन, श्रावण यांच्यासह मारहाण करणारे विष्णू कुंभारकर, प्रभू बारसे हे जखमी झाले. गावकर्‍यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.या प्रकरणी श्रावण गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी विष्णू कुंभारकर, प्रभू बारसे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुगे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार अनिल  राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. उपनिरीक्षक राहुल घुले पुढील तपास करीत आहेत.

Related to this topic: