Nanded illegal sand mining: नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसावर छापा टाकून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध वाळू माफिया पसार.
२५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
नांदेड (Nanded illegal sand mining) : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी गंगाबेट शिवारातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाच्या ठिकाणांवर छापा टाकून सुमारे २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नांदेड ग्रामीण पोलिसांचे पथक २८ एप्रिल रोजी मध्यरात्री गस्त घालत असताना त्यांना गंगाबेट भागातील नदी पात्रात इंजिनच्या सहाय्याने (Nanded illegal sand mining) अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशावरून नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोनि ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने पहाटे ३.३० च्या सुमारास सापळा रचून कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच वाळू माफिया अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या कारवाईत पोलिसांनी पाण्यावर तरंगणारे २० लोखंडी तराफे, वाळू उपसा करणारी ५ मोठी इंजिने, सुमारे ५ ब्रास वाळू असा एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळी विनापरवाना असलेले इंजिन व तराफे पोलिसांनी जाळून नष्ट केले. या (Nanded illegal sand mining) प्रकरणी ५ अज्ञात आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.