Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

नांदेड पोलिस गुन्हेगारी

नांदेडमध्ये पोलिसांचा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर प्रहार

Nanded Police Crime: नांदेड जिल्ह्यात पोलिसांनी 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' अंतर्गत २४ गुन्ह्यांतील गुन्हेगारांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली. नांदेडचे पोलीस अधिकारी त्यांना गुन्ह्यांवर कठोर


नांदेडमध्ये पोलिसांचा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर प्रहार

Nanded Police Crime |

 

तीन गुन्ह्यांतील २४ आरोपींवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई

नांदेड (Nanded Police Crime) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत मोठी आणि कडक कारवाई केली आहे. 'ऑपरेशन क्रॅकडाऊन'  अंतर्गत नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तीन गंभीर गुन्ह्यांतील एकूण २४ सराईत आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा  (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.      
     
नांदेड शहर व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या, टोळ्या बनवून संघटितपणे गंभीर गुन्हे करणाऱ्या आणि वारंवार जामिनावर सुटून पुन्हा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. पोलीस स्टेशन भाग्यनगर आणि विमानतळ, नांदेड अंतर्गत दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा अभ्यास करून, या संघटित गुन्हेगार टोळ्यांवर 'मोक्का' लावण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला २८ मे  रोजी मंजुरी देण्यात आली आहे.
       
या (Nanded Police Crime) कारवाईत नांदेडमधील विविध भागांतील  २४ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे आरोपींमध्ये दिपक  पवार रा. शिवनगर, रोहीत  खिल्लारे  , आकाश तुळे रा. तानाजीनगर,राजेश  पवार तिघे रा. तानाजीनगर, पप्पु उर्फ लालबा  गजलवाड, रा. गोपाळनगर, अविनाश  चव्हाण रा. सखोजीनगर , रोशन हळदे रा. गोविदनगर, प्रशिक उर्फ परश्या ओढणे,चंद्रशेखर उर्फ चंद्या  पाईकराव दोघे रा. संघसेन नगर, इतवारा  सोहेल उर्फ चिंधी फेरोजखान पठाण रा.बालाजीनगर, मोहम्मद तोफीक शेख संदलजी रा. वजीराबाद, साईसिंग ऊर्फ साईलाला  गहरवार रा. सिडको,जयकुमार ऊर्फ सोनु  राऊत रा. सुमेध नगर,शाकेर खान रशीद खान रा. मिल्लतनगर,शेख शाहरुख ऊर्फ कबूतर शेख अजगर रा. खुदबेनगर चौरस्ता, महेबुबीश कॉलनी,शेख उबेद शेख अजगर मिल्लत नगर,दिग्वीजय नारागुडे रा.शामनगर, मन्मत  मंगरुळे रा. लालवंडी रोड, ता. नायगाव,  नितेश  इंगळे शिवनगर, गौरव  गहेरवार रा. शक्तीनगर,  सय्यद आवेज सय्यद खलील रा. खुदबेनगर चौरस्ता, नांदेड (मयत) ,महंमद अरबाज महंमद फारुख रा. इदगाह मैदान, इतवारा, (मयत), इलियास ऊर्फ काला इत्लुखान ईस्माइलखान, रा. खुदबेनगर चौरस्ता,  शेख शहारुख ऊर्फ हंटर, शेख जाफर रा. साई नगर इतवारा यांचा समावेश आहे.

या (Nanded Police Crime) आरोपींनी संगनमत करून वर्चस्वाच्या वादातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. वारंवार कायदेशीर कारवाई होऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती आणि त्यांच्या टोळीमुळे सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता.या टोळ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून, त्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी 'मोक्का' अंतर्गत ही व्यापक कारवाई केली आहे. आगामी काळातही 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' अंतर्गत अशा गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, आणि अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी व अंमलदारांनी पार पाडली आहे.

Related to this topic: