Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

जुगार छापा मारला

Gambling Raid: माळवटा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा…

नांदेड आणि परिसरातील विविध ठिकाणांवर पोलिसांनी छापा मारून जुगार खेळणाऱ्यांकडून १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.


gambling raid माळवटा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा…

नांदेड, कळमनुरी हदगाव, लोहा वसमत तालुक्यातील जुगारी ताब्यात
कार मोबाईल व रोख रकमेसह दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त

वसमत (Gambling Raid) : तालुक्यातील माळवटा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वसमत ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा मारला. या छाप्यात नांदेड कळमनुरी, हदगाव , लोहा, वसमतसह विविध गावातील नऊ जुगारी पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. जुगार खेळणार्‍यांकडून कार मोबाईल व रोख रक्कम असा एकूण नऊ लाख ७९ हजार २६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या (Gambling Raid) छाप्यामुळे जुगार चालक व जुगार खेळणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांच्याआदेशाने अवैध व्यवसाया विरोधात धडक मोहीम सुरू असतानाही अवैध व्यवसायिकांना कारवाईची भीती राहिली नसल्याचे चित्र समोर येत आहे.

वसमत ग्रामीण पोलिसांना माळवटा शिवारात जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह पोलीस पथकाने १२ मार्च रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास माळवटा शिवारातील जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला. या छाप्यात धोंडीबा रामचंद्र बागल रा. बागलपार्डी , मन्मथ मुंजाजी उदगीरे,रा जवळापांचाळ तालुका कळमनुरी, दादाराव बालाजी नादरे, रा.गिरगाव , राजु उत्तम पवळे, रा. जानापुरी ता. लोहा, प्रफुल्ल भगवानराव शिंदे, रा. पिवळीगिरणी नांदेड, सोनाजी ज्ञानेश्वर निळकंठे, रा. सोडेगाव ता. कळमनुरी, राधेश्याम गंगाजी आळणे, रा. मनाठा ता. हदगाव, ज्ञानेश्वर उर्फ माऊली सटवाजी माखणे,रा. रुंज ता. वसमत या (Gambling Raid) आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१२ मार्च रोजी रात्री २३.२० वाजण्याच्या सुमारास मौजे माळवटा शिवारात भुमी कंपनीच्या पाठीमागील गायरानात हे (Gambling Raid) जुगारी जुगार खेळत होते. जुगाराच्या ठिकाणावरून कार क्रमांक ३८ ए के ३७०२ जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे जुगार खेळण्यासाठी चार चाकी वाहनातून जुगारी आले असल्याचे समोर येत आहे पोलिसांनी कार, मोबाईल ,रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण नऊ लाख ७९ हजार २६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या छाप्यात वसमत हदगाव कळमनुरी लोहा, नांदेड या भागातील जुगारी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.

या छाप्यामुळे जुगार अड्डा चालवणारे व जुगार खेळणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या तक्रारीवरून जुगार खेळणार्‍या आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ई. जी. डक करत आहेत. या छाप्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.

Related to this topic: