Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

कन्हान पोलीस स्टेशन

अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलीसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

Kanhan Police Station: नागपूर ग्रामीण पोलीसांनी कन्हान परिसरात एका तरुणाला देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे सह पकडले. त्याच्याकडे ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.


अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलीसांनी पकडले मुद्देमाल जप्त

Kanhan Police Station |

अग्निशस्त्र काडतुसा सह ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीसांची कामगिरी

कन्हान (Kanhan Police Station) : पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा उडाण पुला जवळ देशी बनावटीचे अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीसांनी पकडले. कारवाईत अग्नीशस्त्र व दोन जिवंत काडतुसा सह ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस कन्हान (Kanhan Police Station) परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, कन्हान गहुहिवरा उडाण पुला जवळ एक तरुण देशी बनावटीचे अग्नीशस्त्र बाळगुन कोण त्यातरी हस्तक्षेपनीय गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत आहे. अश्या मिळालेल्या माहिती नुसार पोलीसांनी गहुहिवरा रोड जवळील हायवे उडाण पुलाजवळ साप ळा रचला असता एक तरुण संशयास्पदरीत्या फिरता ना दिसुन आला. पोलीसांना पाहुन त्याने पळ काढला . त्याच्या वरील संशय अधिक बळावल्याने त्याला  पकडण्यात पोलीसांना यश आले.

आरोपी अजित राजु मनहरे वय २४ वर्ष रा. कामठी कॉलनी खदान नं.३ याची अंगझडती घेतली असता कमरेला देशी बनावटीचे पिस्टल (माउजर) हे अग्निशस्त्र मिळुन आले. अग्निशस्त्राच्या मॅगझीन मध्ये २ जिवंत काडतुसे मिळुन आल्या. सदर अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याचे जवळ कोणताही परवा ना नसल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी आरोपी ला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन देशी बनावटीचे पिस्टल (माउजर) किंमत ४५,००० रूपये, २ जिवंत काडतुसे किंमत २००० रूपये असा एकुण ४७,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरो पी विरूद्ध पोलीस स्टेशन कन्हान येथे कलम ३/२५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून नमुद आरो पीस पोलीसांनी अटक केली असुन साखळी पुरावे जोडुन पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.

सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस (Kanhan Police Station) अधि क्षक मा. हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात सपोनी किशोर शेळकी, एएसआई विनोद काळे, पो हवा प्रमोद भोयर, पोना संजय बरोदिया, पोशी अभि षेक देशमुख, आशुतोष लांजेवार सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

Related to this topic: