Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

नागपूर घरफोडी

बंद घर फोडून १.९१ लाखांचा ऐवज लंपास

Nagpur burglary: नागपूरमधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घर फोडून १.९१ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल चोरून नेला.


बंद घर फोडून १९१ लाखांचा ऐवज लंपास

Nagpur burglary |

नागपूर (Nagpur burglary) : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवछत्रपतीनगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्या विकास शाळेजवळ राहणारे अनिल बाळकृष्ण बोरसरे (वय ४१) हे १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराला कुलूप लावून पाचपावली येथील नातेवाईकांकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी (Nagpur burglary) घरावर डल्ला मारला. त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.

यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून ११ हजारांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ९१ हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी सुमारे ८ वाजता अनिल बोरसरे घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. घरात पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या (Nagpur burglary) प्रकरणी अनिल बोरसरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: