Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > क्राईम जगत

अंमली पदार्थ औषध छापा

अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; कन्हान मध्ये औषधांच्या नावाखाली नशेचा व्यापार उघड

Kanhan Drug Raid: नागपुर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कन्हान परिसरात मोठी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रामाडोल गोळ्यां चा साठा जप्त केला


अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा कन्हान मध्ये औषधांच्या नावाखाली नशेचा व्यापार उघड

Kanhan Drug Raid |

 

कन्हान हादरले! नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या टॅब्लेटचा मोठा साठा पोलिसांच्या जाळ्यात

३.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

कन्हान (Kanhan Drug Raid) : नागपुर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कन्हान परिसरात मोठी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रामाडोल गोळ्यां चा साठा जप्त केला आहे. या कारवाईत १५ हजारांहुन अधिक टॅब्लेट, चारचाकी वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकुण ३ लाख ६३ हजार २० रुपयां चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन या प्रकर णी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
           
प्राप्त माहितीनुसार (दि.२१) जुलै २०२६ ला नागपुर ग्रामीण अंमली पदार्थ विरोधी पथक कन्हान उपविभागाच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. कन्हान-कांद्री येथील कोळसा खदान कॉलोनी नं. ३ मध्ये राहणारा शोरब जब्बर अन्सारी वय ४० वर्ष हा त्याच्या राहत्या घरातुन नशा आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची किरकोळ विक्री करत असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या (Kanhan Drug Raid) कारवाई दरम्यान आरोपी च्या ताब्यातुन 'पियॉन स्पास प्लस' (ट्रामाडोल एचसी आय) या औषधाच्या तब्बल ६६ बॉक्समधील १५ हजार ८१४ टॅब्लेट जप्त करण्यात आल्या. या गोळ्यां चे एकुण वजन ७.९०७ किलो इतके असुन त्यासोबत दोन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे ट्रामाडोल हे औषध वैद्यकीय वापरासाठी असले तरी त्याचा गैर वापर करून नशेसाठी वापर केल्या जाणाऱ्या घटनां मध्ये वाढ होत असल्याने पोलिसांकडुन अशा प्रकरणां वर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. कन्हान परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्यांचा साठा आढळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
           
या (Kanhan Drug Raid) प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात एनडीपी एस कायद्यातील कलम ८ (क) आणि २२ (सी) अन्व ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी कडुन हा साठा कुठुन आणण्यात आला. त्याची विक्री कुणा ला केली जात होती तसेच या रकेट मध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास पोली स करीत आहेत. या कारवाईस नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच कन्हानचे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड‌, पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचे मार्गदर्शन लाभले.

ही (Kanhan Drug Raid) कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि अजितसिंग देवरे, पोउपनि प्रवीण भिमटे,पोहवा प्रविण देव्हारे, प्रकाश ठोके, अमोल नागरे, अविनाश तोडसाम आणि पोशि अनिल खरडकेले यांनी संयुक्त रीत्या पार पाडली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास सुरू असुन या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात नागपुर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका स्पष्ट केली आहे.