Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > क्राईम जगत

कन्हान ट्रक आग

टेकाडी बंद टोल नाक्याजवळ दहाचाकी ट्रक सामानसह जळुन खाक

Kanhan Truck fire: नागपुर ते सतना मार्गावरील टेकाडी बंद टोल नाक्याजवळ दहाचाकी ट्रकाला आग लागून तो पूर्णपणे जळून खाक झाला. लाखोचे नुकसान झाले असून जिवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.


टेकाडी बंद टोल नाक्याजवळ दहाचाकी ट्रक सामानसह जळुन खाक

Kanhan Truck fire |

कन्हान (Kanhan Truck fire) : नागपुर येथुन गुड गँरेजमधुन वेगवेगळे सामान दहाचाकी ट्रकमध्ये भरून टीसीएन कपंनी सतना मध्यप्रदेशला जात असताना पहाटे सकाळी नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी बंद टोल नाक्याजवळ ट्रकमध्ये आग लागुन, लोखंडी सामान वगळता इतर व (Kanhan Truck fire) ट्रक जळुन राख झाल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. यामध्ये कुठलीही जिवहानी झाली नाही. 

गुरूवार (दि.९) एप्रिल ला नागपुर येथुन गुड गँरेज मधुन दहा चाकी ट्रकमध्ये मोठे लोंखडी पाईप, कपलिंग, ग्रेर बॉक्स सारख्या मशीन, वॉटर मशीन, लाकडी पत्रे, मोमने भरलेला ड्रम , चिंधी बाजारातील कपडेसह इतर सामान भरून टी सी एन कपंनी सतना मध्य प्रदेश ला जात असताना शुक्रवार (दि.१०) एप्रिल ला पहाटे सकाळी २.४५ ते ३ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी बंद टोल नाक्याजवळील सर्व्हीस रोडवर ट्रकमध्ये आग (Kanhan Truck fire) लागल्याचे ट्रक चालकास समजताच ट्रक चालक व क्लीनर दोघेही ट्रक थाबवुन खाली उतरून पाहीले तर ट्रकमध्ये चांगलीच आग लागली होती.

त्यानी आग विझविण्याकरिता पर्यंत केला, परंतु पहाटे ३ वाजले असल्याने मदत मिळु शकली नाही. सकाळी कन्हान नगरपरिषदेची अग्निशामक वाहन येऊन ८.३० वाजे पर्यंत आग विझविण्यात आली. परंतु लोखंडी सामान वगळता इतर व ट्रक जळुन राख झाले. कन्हान पोलीस स्टेशन चे पीएसआय प्रविण हारगुडे स्टापसह घटनास्थळी पोहचुन ट्रक चालकाच्या तक्रा रीवरून घटनेची नोंद करून पुढील तपास करित आहे. यात कुठलीही जिवितहानी झाली नसुन, (Kanhan Truck fire) ट्रकमध्ये आग लागल्याचे कारण काही समजु शकले नाही.

Related to this topic: