Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

कळमनुरी तरुण खून

जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून; कळमनुरीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा

Kalmanuri youth murder: कळमनुरीत, एक भांडणातून 23 वर्षीय तरुण नवनाथ शिवाजी बेद्रे याचा दगडाने खून केला गेला. पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे,


जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून कळमनुरीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा

Kalmanuri youth murder |

कळमनुरी (Kalmanuri youth murder) : शहरातील साईनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून 23 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना 23 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी ग्यानबाराव बेद्रे (वय 45, रा. पाटील गल्ली, कळमनुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा नवनाथ शिवाजी बेद्रे (वय 23) याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना 23 मे रोजी रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास कपील बार, साईनगर कळमनुरीच्या बाजूला असलेल्या रेतीच्या ढिगाजवळ घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर बबनराव शिंदे, परमेश्वर उर्फ बंटी हरीभाऊ जाधव, भारत शंकरलाल यादव, दुर्गेश लक्ष्मणराव गाभणे, आकाश विठ्ठलराव सातव आणि सुरेश विठ्ठलराव सातव यांनी संगनमत करून जुन्या भांडणाचा वाद काढत नवनाथ बेद्रे याला जिवे मारण्याचा कट रचला. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या (Kalmanuri youth murder) प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात 24 मे रोजी पहाटे 2.32 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. चार आरोपींना पोलिसांनी पहाटे 4.27 वाजता अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक हिंगोली, एसडीपीओ हिंगोली शहर, पोलीस निरीक्षक माकोडे आणि पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

Related to this topic: