Land Dispute Murder: निलंगा तालुक्यातील हरिजवळगा येथे बुधवारी शेतीच्या वादातून आरोपी मुरलीचे चुलत चुलत्या डोक्यावर दगडाने हत्या करावी. आरोपी स्वतःही पोलिसांना ठाण्यात आलेली आहे.
हरी जवळगा येथील घटना: आरोपी स्वतःहून ठाण्यात हजर
कासारशिरसी (Land Dispute Murder) : शेत वाटणीच्या कारणावरून पुतण्याने चुलत चुलत्याची दगडाने ठेचून हत्या केली. निलंगा तालुक्यातील हरीजवळगा येथे बुधवारी (दि.१५) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हत्त्येनंतर आरोपी स्वतःहून कासार शिरशी पोलीस ठाण्यात हजर झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, हरीजवळगा (ता. निलंगा) येथील राजु उर्फ राजेंद्र शामराव चव्हाण यांचा भावकी सोबत अनेक दिवसांपासून शेतीच्या वाटणी वरुन वाद होता. हाच वाद बुधवारी (दिनांक १५) सकाळी आठच्या सुमारास मयत राजेंद्र शामराव चव्हाण व आरोपी मुरली चन्नाप्पा चव्हाण यांच्यात मयताच्या शेतात चालू झाला. या वादात राग अनावर होऊन आरोपी मुरली चन्नाप्पा चव्हाण याने मयत राजेंद्र शामराव चव्हाण याच्या डोक्यात दगडाने व काठीने मारण्यास सुरुवात केली.
आरोपी मुरली याने डोक्यात एवढे दगड घातले की, यात राजेंद्र चव्हाण जबर जखमी होऊन मरण पावला. राजेंद्रची आपल्या हातून हत्या झाल्याचे लक्षात येताच आरोपी मुरली चव्हाण याने स्वतः ठाण्यात हजर होऊन हत्त्या केल्याची कबुली दिली व ठाण्यात अटक झाला. या घटनेची फिर्याद मयताचा मुलगा संतोष चव्हाण याने दिल्यावरुन आरोपी मुरली चन्नाप्पा चव्हाण याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १७५/२६ कलम १०३ (१) बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रताप गर्जे यांच्यासह अंमलदार आबा इंगळे, शंकर बुड्डे करीत आहेत.